27 April 2024 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

सावधान! अघोषित आणीबाणी? सरकार तुमच्या कम्प्युटरवर वॉच ठेवणार : सविस्तर

नवी दिल्ली : मोदी सरकार आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके हालचालींवर बारीक नजर असणार आहे. कारण, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील तब्बल १० मोठ्या एजन्सींना तुमच्या खासगी कम्प्युटरवर थेट नजर ठेवण्यासाठी परवानगी बहाल करण्यात आली आहे. या सर्व संबंधित १० एजन्सी एकप्रकारे तुमच्यासाठी गुप्तहेराचेच काम करणार असून त्या केव्हाही तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहिती तपासू शकतात. त्यामुळे तो कम्प्युटर तुमच्या मालकीचा जरी असला तरी त्याचा वापर आणि साठवलेल्या माहितीची काळजी घ्या.

दरम्यान, मोदी सरकारच्या या विवादित निर्णयामुळे केंद्र सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अबकी बार निजता पर वार’, असे म्हणत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोदी सरकार आता तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहितीवर नजर ठेवणार आहे. त्यासाठी मोदी सरकारने तब्बल १० बड्या एजन्सी नियुक्त करून व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.

काय भाष्य केले आहे विरोधकांनी या विषयाला अनुसरून?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x