6 May 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

एकवेळ हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होत नाहीत: गडकरींचं विधान

सांगली: सध्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार अशी चर्चा रंगली असताना गडकरी मात्र रोज नवनवीन विधानं करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू मांडली आणि अडचणी मांडल्या होत्या. परंतु प्रसार माध्यमांनी टीका करताच पुन्हा घुमजाव केले होते. त्यात आता पुन्हा त्यांनी सांगली येथील कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य केले आहे.

दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सिंचनावर विचार व्यक्त करताना ‘एक वेळ हिजड्याला मुलं होतील, परंतु सिंचन योजना काय पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असं गडकरी यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य केले आहे.

उपस्थित शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ पुन्हा घसरली असंच म्हणावं लागेल . टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी म्हणाले, ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हाला देखील वाटलं नव्हतं. खरंतर असं बोलू नये. तरी बोलतो. ‘एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाही. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. अखेर शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.

परंतु, याआधी महाराष्ट्रात सिंचन योजना झाल्याचं नाहीत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ काही तरी उदाहरणं देण्यासाठी गडकरी मागील अनेक दिवसांपासून काही सुद्धा धक्कादायक विधानं करत आहेत. राज्यात आणि देशात सर्वकाही भाजप सरकार सत्तेत आल्यावरच झालं आहे, अशा अविर्भावात भाजपची नेते मंडळी वावरत आहेत असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x