मुंबई : आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सामनातील आजच्या संपादकीय मध्ये आलेल्या अग्रलेखाचा संदर्भ घेऊन निलेश राणेंनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा त्यांच्याच भाषेत चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

आमदार नितेश राणेंनी शिवसेनेच्या सत्तेतील सहभागावरुन शिवसेनेला सणसणीत टोला हाणला आहे. त्यावर ट्विट करताना नितेश राणेंनी म्हटलं आहे की, “असंख्य नवरे बोलत असतील…..बायको शिवसेनेसारखी पाहिजे!! लफडी कळली तरी सोडत नाही.. जास्तच जास्त तर काय….एक सामन्यातून अग्रलेख!!
बाकी संसार सुरु!! असं ट्विट करुन नितेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला हाणला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भारतीय जनता पक्षाने एनसीपीच्या मदतीने हिसकावून घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना नेतृत्वाने आज सामनामधील अग्रलेखामधून भारतीय जनता पक्षावर खरमरीत भाषेत टीका केली आहे. त्यावर सामनामध्ये भाष्य करताना भाजपा आणि एनसीपी’मधील लफडे जुनेच आहे. आता, नगरमध्ये ते पुन्हा केवळ उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली, असा घणाघात सामनामधून भाजपावर करण्यात आला आहे. त्यावरूनच नितेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून जोडा हाणला आहे.

नेमकं काय ट्विट केलं आहे आमदार नितेश राणे यांनी?

mla nitesh rane says wife should be shivsena