30 April 2024 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
x

हिम्मत असेल तर मोदींनी आर्थिक मुद्यांवर माझ्याशी चर्चा करावी: चंद्राबाबूंचं आव्हान

अमरावती : मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय आर्थिक फायदा झाला यावर पंतप्रधानांनी थेट माझ्याशी चर्चा करावी असे खुले आव्हान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी एअनआय’ला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने अपेक्षित आर्थिक वाढीचा दर गाठला का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, तत्कालीन काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या कार्यकाळात सुद्धा आर्थिक वाढीचा दर चांगला नसेल. परंतु, या मोदी सरकारच्या काळातही हा चांगला नाही हे मान्य करावे लागेल. GST आणि नोटाबंदीमुळे आर्थिक वाढ झाली का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची आर्थिक प्रणाली उद्ध्वस्त झाल्याचा सणसणीत आरोप त्यांनी केला. दरम्यान, आर्थिक मुद्यांवर मोदींनी माझ्याशी खुली चर्चा करावी, असे थेट आव्हान सुद्धा त्यांनी मोदींना दिले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x