21 May 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा
x

मनसेचे नाव पुढे करून आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? असीम सरोदे

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आयोजक कारणं देते आहे.

दरम्यान, वकील असीम सरोदे यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरुन आयोजकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात की, ‘मनसेचे नाव पुढे करून कुणाच्या सांगण्यावरून नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले ? कुणाच्या गैरसोयीचे त्या बोलणार होत्या? आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? यात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात, कट्टरवादी विचारसरणीचा हस्तक्षेप आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न सरोदे यांनी सार्वजनिकरित्या उपस्थित केले आहेत. दरम्यान स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रक प्रसिद्ध करुन स्वतःची आणि पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करून विषय निकाली काढला आहे.

दरम्यान, डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण आम्ही रद्द करीत असल्याचे कळवले आहे. त्यात मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने आम्ही हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे कारण त्यांनी पुढे रेटले होते. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं होतं की एवढा मोठा निर्णय एखाद्या स्थानिक शाखेच्या सांगण्यावर आयोजक कसे काय घेऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करत दुसरीच शंका व्यक्त केली होती.

नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x