4 May 2025 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Shivsena Hijacked | 'मूळ पक्ष' शिवसेना आणि 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी भाजपची विशेष टीम शिंदेंच्या मदतीला

Shivsena Hijacked

Shivsena Hijacked | शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी देखील या विषयात लक्ष घालून असल्याची माहिती दिल्लीच्या गोटातून समोर येते आहे. यासाठी २-३ महिने आधीच फिल्डिंग लावली होती असं वृत्त आहे. हा गट पूर्णपणे भाजप ऑपरेट करेल अशी शक्यता बळावत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या निवेदनानंतर शिवसेनेचे आणखी आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माहिमचे आमदार सदा सरवणकर, कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर आणि माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकरही गुवाहाटीत पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदेंना आवश्यक असलेल्या आकड्याची बेरीज जवळपास झाली असल्याचं दिसतंय. दुसरीकडे एकाच वेळी दोन तृतीयांश आमदार फुटल्याने शिवसेनेच्या बाजूने बोटावर मोजण्याइतकेच आमदार शिल्लक राहिले आहेत.

पुढे काय होणार :
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिल्याने आता राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हं आहेत. एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांची खात्री झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी आणखी मोठा धक्का असणार आहे.

शक्यता क्रमांक १ :
शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. जर एकनाथ शिंदे ३७ आमदार किंवा त्यापेक्षा जास्त आमदारांचा गट म्हणजेच आमदारांच्या संख्येच्या दोन तृतीयांश आमदारांची एकजूट करण्यात यशस्वी झाले तर तर त्यांच्या गटावर पक्षांतर बंदीच्या कायदान्वये कारवाई होणार नाही. तसं घडल्यानंतर भाजप अविश्वास प्रस्ताव आणला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने जर भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजपची सत्ता येईल.

शक्यता क्रमांक २ :
जर भाजपने अविश्वास प्रस्ताव आणला त्यानंतर जर एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केलं तर ती मतं अयोग्य ठरवली जातील. या जागांवर पुन्हा निवडणूक होईल. त्यानंतर शिवसेनेचं भवितव्य अयोग्य ठरणाऱ्या आमदारांच्या संख्येवर अवलंबून असेल.

तिसरी शक्यता :
जर बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला तर सभागृहातील सदस्यांची संख्या कमी होईल. त्यानंतर सरकारचं भवितव्य हे राजीनामा देणाऱ्या आमदारांच्या संख्येवर अवलंबून असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Hijacked by leader Eknath Shinde next what check details 23 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena Hijacked(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या