सिल्वासा: देशभरातील विरोधकांची आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशवासीयांच्या विरोधात आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. आमचं केंद्रातील सरकार केवळ एका कुटुंबासाठी काम करत नाही. ते १३० कोटी देशवासीयांसाठी मेहनत करतं आहेत. खरंतर लोकशाहीचा गळा दाबणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करत आहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर भाषणादरम्यान जोरदार निशाणा साधला.

कोलकात्यात आज ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासह एकूण २२ पक्षांची भव्य महारॅली आयोजित करण्यात आली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन एकजुटीने मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी आज विविध कार्यक्रमांसाठी दीव-दमण मधील सिल्वासाच्या दौऱ्यावर आहेत.

भारतीय जनता पक्षामुळे आज पश्चिम बंगालमध्ये देशातील सर्व भ्रष्टाचारी राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आमच्या सरकारने भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू करताच राष्ट्रीय काँग्रेसला खूप भीती वाटू लागली आणि त्यानंतर तत्परतेने महाआघाडीचे प्रयत्न सुरू झाले. भारत जगातील सर्वोत्तम देश व्हावा, असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे आम्ही १३० कोटी लोकांसाठी राबत आहोत. आमच्या सरकारचं कामावर लक्ष आहे. कारण आम्ही केवळ कामदार आहोत आणि नामदार नाहीत, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

pm narendra modi on silvasa tour and criticised oppositions