20 May 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

ते म्हटले होते मोदी पंतप्रधान व्हावे 'ते' झाले, काल म्हणाले मोदींची उलटी गिनती सुरु होणार 'ती' झाली?

मुंबई : सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.

दरम्यान, आरबीआय – सीबीआय – न्यायाधीश ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून सर्वच मोदी राजवटीत हैराण झाल्याचे पहायला मिळत होते. २०११ मध्ये गुजरात भेटीवर गेलेलं मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावे असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांचे ते विधान २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत सत्यात उतरले होते आणि मोदी बहुमताने या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

परंतु, एकूणच सर्व बाजूने आलेला नकारात्मक अनुभव आणि शेतकऱ्यांपासून ते सामान्य लोकांची झालेली फसवणूक आणि चुकीची धोरणं, यामुळे अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.दरम्यान, कालच त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदवताना नरेंद्र मोदी यांच्या सरकारची उलटी गिनती झाल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान आजच्या ५ राज्यांमधील निकालाअंती भाजपच्या वाट्याला एकही राज्य येताना दिसत नसल्याने, राज ठाकरेंची ही भविष्यवाणी सुद्धा दुसऱ्याच दिवशी सत्यात उतरताना दिसत आहे. भाजपच्या कार्यालयांमध्ये सन्नाटा पसरल्याचे दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x