2 May 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

विधानसभा: राजस्थानमध्ये आदित्य ठाकरेंकडे मतदारांचं दुर्लक्ष, प्रचार वाया गेला

जयपूर : शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष बनण्याचा ध्यास घेतला खरा, परंतु सर्वच ठिकाणी अपयशाची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरलेले आदित्य ठाकरे यांना पूर्णतः अपयश आले आहे. इथल्या मतदारांनी मतदान करताना शिवसेनेला साधं विचारात सुद्धा घेतले नसल्याचं दिसतं आहे.

शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष बनवून देशभर पक्षविस्ताराची जवाबदारी स्वीकारणाऱ्या आदित्य ठाकरेंना राजस्थान विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आल्याचे दिसत आहे. राजस्थानमधील ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तिथं जाऊन आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. तसेच प्रचारादरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन थेट आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं.

‘क्या मांगे राजस्थान; तीर कमान-तीर कमान’, असा नारा त्यांनी प्रचार सभेत दिला होता. परंतु इथल्या शिवसेनेच्या अवस्थेवरून शिवसेनेला स्थानिक मतदाराने पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचे चित्र निकालाअंती समोर येते आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x