3 May 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

माजी संरक्षण मंत्री आणि बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

नवी दिल्ली : देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे काल सकाळी दिल्लीतील इस्पितळात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. कामगार नेते, मुंबईच्या सामान्यांशी जोडलेले आणि उभ्या हयातीत मोठी पद भूषवून देखील जमिनीवर राहिलेले, तसेच एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती.

मागील अनेक दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर इस्पितळात उपचार सुरु होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी सर्वप्रथम १९६७ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभूत करत पाहुल्यांदा लोकसभेत गेले. परंतु, १९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला त्यांनी नेहमीच कडाडून विरोध केला होता. तसेच स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी त्याकाळी सर्व शक्तीनिशी नेतृत्व केले होते.

विशेष म्हणजे आणीबाणीच्या काळात सुद्धा त्यांनी तुरुंगवास भोगला होता. १९७७ साली मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली देशात सत्तारूढ झालेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले. दरम्यान, जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा तडकफडकी राजीनामा दिला होता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x