20 May 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Reliance Infra Share Price | 2400 रुपयांचा रिलायन्स इंफ्रा शेअर 184 रुपयांवर आला, आता शेअर खरेदीसाठी लोकं तुटून पडले

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला यातिमाहीत 294.06 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 162.15 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता.

कालच्या ट्रेडिंग सेशनमधे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 184.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 177.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, सप्टेंबर 2023 या तिमाहीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने 7,373.49 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने 6,411.42 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीने 7,100.66 कोटी रुपये खर्च नोंदवला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 6,395.09 कोटी रुपये खर्च केला होता.

मागील पाच दिवसांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 184.25 रुपयांनी मजबूत झाले आहेत. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 33.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 25.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 49 टक्के कमजोर झाली आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 93 टक्के घसरला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE 10 November 2023.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x