28 April 2024 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड गुंतवणूक तुम्हाला 40 व्या वर्षी करेल करोडपती, जबरदस्त परतावा कसा मिळेल जाणून घ्या

mutual fund calculator

Mutual Fund Calculator | जर तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सहज लक्षाधीश होऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला म्युचुअल फंदात दीर्घ कालावधी साठी आणि नियमित गुंतवणूक करावी लागेल.

कमी वेळेत भरघोस परतावा :
साधारणपणे आपल्याला सर्वांना स्मार्ट गुंतवणूकदार व्हायचे असते. त्याच वेळी काही लोक जोखीम घेऊन गुंतवणूक करत असतात, तर काहींना सुरक्षित गुंतवणूक परतावा हवा असतो. गुंतवणूकदाराने योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गाने गुंतवणूक केली तर तो जोखमीच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त कमाई करू शकतो. म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत करोडपती होऊ शकतो. दरम्यान, तोटा होऊ नये म्हणून कुठे आणि किती गुंतवणूक करावी लागेल आणि कशी गुंतवणूक करावी, याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

म्युचुअल फंड बाबत तज्ञांचे मत :
म्युच्युअल फंड गुंतवणूक तज्ञ नेहमी म्हणतात की ‘म्युच्युअल फंड एसआयपी परतावा कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर त्यावर सरासरी 10 ते 12 टक्के चक्रवाढ व्याज परतावा मिळू शकतो. जर तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर त्याच्यासाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे असा सल्ला अर्थ तज्ञ नेहमी देतात. मात्र, त्यातही जोखीम आहे कारण ती बाजारपेठेतील उलाढालीशी जोडलेली आहे.

वयाच्या 40 व्या वर्षी आर्थिक ध्येय कसे पूर्ण करावे?
जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत लक्षाधीश बनण्याचे ध्येय ठेवत असाल, तर तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडात किमान 12 टक्के वार्षिक चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळेल. यामुळे तुम्ही आपले दीर्घकालीन आर्थिक ध्येय साध्य करू शकता. तुमचे आर्थिक गुंतवणुकीचे लक्ष गाठण्यासाठी गुंतवणुकीची सुरुवात करताना तुमचे वय किमान 25 वर्षे असेल, तरच तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी लक्षाधीश होण्याचे तुम्ही उद्दिष्ट साध्य करू शकता.

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर :
समजा तुमचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर तुम्हाला दरमहा किमान 9000 रुपयांची गुंतवणूक सुरू करावी लागेल आणि दरवर्षी त्यात १५ टक्के वाढ करत राहावी लागेल. जर तुम्ही 15 वर्षे अशीच गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळेल आणि वयाच्या 40 व्या वर्षी तुमच्याकडे 1 कोटी रुपयांचा निधी तयार असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund calculator for long term investment returns on 4 August 2022.

हॅशटॅग्स

mutual fund calculator(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x