29 April 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jai Balaji Share Price | कुबेर करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील एका वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता
x

Raksha Bandhan 2022 | रक्षाबंधनाच्या नेमक्या तारखेबाबत संभ्रम?, राखी बांधण्यासाठी दिवसभरातील शुभ मुहूर्त जाणून घ्या

Raksha Bandhan 2022

Raksha Bandhan 2022 | भावा-बहिणीचे प्रेम म्हणून दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. संपूर्ण भारत तो मोठ्या उत्साहात साजरा करतो. रक्षाबंधनावेळी देवाची सुद्धा पूजा केली जाते आणि मग बहिणी आपल्या भावांची ओवाळणी करतात आणि भावाच्या मनगटावर राखी बांधतात. याशिवाय घरात गोड पदार्थ देखील बनवले जातात आणि भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात. यामुळे खासकरून भावंडांमध्ये या सणाबद्दल प्रचंड उत्साह असतो.

कोणत्या दिवशी साजरा होणार रक्षाबंधनाचा सण :
यंदा 11 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करण्यात येणार आहे. मात्र, हिंदू दिनदर्शिकेनुसार ११ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट या दोन्ही तारखांना तो साजरा करता येतो. हे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरे केले जाते ज्याला श्रावण पौर्णिमा किंवा कजरी पूनम देखील म्हटले जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेची तारीख गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपासून सुरू होईल. पौर्णिमा तिथी शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. या दिवसाचा शुभ काळ खालीलप्रमाणे आहे.

रक्षाबंधनासाठी असा आहे शुभ मुहूर्त :
* पौर्णिमा तिथी गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी सुरू होत आहे.
* पौर्णिमा तिथीची सांगता शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07 वाजून 05 मिनिटांनी होईल.
* गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी भद्रा काळ सुरू होत आहे.
* भद्रा काळ गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री ०८ वाजून ५१ मिनिटांनी संपत आहे.
* राखीसाठी शुभ काळ गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी रात्री 08 वाजून 51 मिनिटांपासून रात्री 09 वाजून 12 मिनिटांपर्यंत आहे.

12 ऑगस्ट ही पौर्णिमा तिथीही असणार असल्याने त्या दिवशी कधीही राखी बांधता येईल, असं ज्योतिषींचं म्हणणं आहे. त्यामुळे हा सण १२ ऑगस्टला साजरा करता येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी राखीचा शुभ काळ खालीलप्रमाणे आहे.

* अभिजित मुहूर्त शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ५९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असेल.
* शुभ चोघडिया शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ५२ मिनिटे ते ०२ वाजून ५ मिनिटांपर्यंत आहे.

राखी बांधणे, भेटवस्तू देणे आणि आरती करणे या रक्षाबंधनाबरोबर येणाऱ्या काही सुंदर प्रथा आहेत. ही वर्षाची ती वेळ आहे जेव्हा कुटुंबे जवळ येतात आणि नातेसंबंध अधिक दृढ होतात. हिंदू सणांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते संपूर्ण कुटुंबाला एकाच छताखाली आणतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Raksha Bandhan 2022 Puja Timings Shubh Muhurat Auspicious Time To Tie Rakhi check details 10 August 2022.

हॅशटॅग्स

#Raksha Bandhan 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x