4 May 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

सरन्यायाधीश रमणा 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार | दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्ष सुनावणी प्रकरणी तारीख पे तारीख

Maharashtra Political Crisis

CJI NV Ramana | आज (22 ऑगस्ट) ही सुनावणी पार पडणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी उद्या म्हणजे 23 ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता उद्या होणाऱ्या सुनावणींमध्येही महाराष्ट्रातील प्रकरण नाही. त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

या आधी राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 4 ऑगस्टला शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता चौथ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे. सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. या सुनावणीबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने सरन्यायाधीश रमण्णा यांच्या कारकीर्दीत याचा निकाल लागेल ही आशा आता मावळत चालली आहे.

सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत, निवृत्तीआधी ते हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतात का? हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच प्रकरण घटनापीठाकडे गेले तर ते अधिक काळ लांबेल याचीही शक्यता आहे. मात्र काही मुद्द्यांवर घटनापीठाकडे हे प्रकरण जाईल, पण काही मुद्द्यांवर कोर्ट आपला निकाल देतं का याचीही उत्सुकता असल्याने दोन्ही बाजूला धाकधूक सुरु आहे. विशेषत: अपात्रतेसंदर्भातल्या कारवाईबाबत आता अजून किती काळ स्थगिती राहते हे पाहणं महत्वाचं असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra political crisis hearing in the supreme-court is likely to be postpone again check details 22 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra Political Crisis(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या