12 December 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

पिंपरीत तीन सख्या भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू

Kalapure Family In Pimpri, Covid19

पिंपरी, २० जुलै : पुण्यात १४ जूनपासून सतत लॉकडाऊन सुरू आहे. सर्वात कडक लॉकडाऊन लागू करूनही पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. उलट लॉकडाऊनच्याच काळात कोरोनाग्रस्तांची संख्या बेसुमार वाढत आहे. पुण्यात काल दिवसभरात २,४५९ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ६१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. कालची रुग्ण संख्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही ५०,००० पेक्षा जास्त झाली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात एकाच कुटुंबातील १८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यांपैकी, तीनही सख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती संबंधित कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली. मृत्यू झालेल्या तिन्ही भावांचे वय ६० वर्षांच्या पुढे होते.

पोपटराव कलापुरे (वय ६६), ज्ञानेश्वर कलापुरे (वय ६३) आणि दिलीपराव कलापुरे (वय ६१, सर्वजण रा. पिंपरी) असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत. त्यांच्यावर १५ दिवसांपासून चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

 

News English Summary: In Pimpri-Chinchwad, 18 members of the same family were infected with corona. Of these, all three brothers died during treatment, according to family members. The three deceased brothers were over 60 years of age.

News English Title: The Pillars Of The Kalapure Family In Pimpri Collapsed Three Siblings Were Killed By Corona News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x