17 May 2024 8:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

तेजस्वी यादव यांची धडाकेबाज प्रतिक्रिया | त्यांना जे करायचे आहे ते करू दे, लवकरच सौ सुनार की एक लोहार की

Bihar Political Crisis

Bihar Political Crisis | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेत्यांच्या घरांवर सुरू असलेल्या सीबीआयच्या छाप्यांवर मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेतून बाहेर आल्यानंतर बुधवारी ते म्हणाले की, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, थोडा धीर धरा. आम्ही सुद्धा सौ सुनार का एक लोहार की! लवकरच करू. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारची बुधवारी दुपारी विधानसभेत फ्लोर टेस्ट होणार आहे.

विजय सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर घराबाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आरजेडी नेत्यांच्या घरांवरील सीबीआयच्या छाप्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “काही तासांचा विलंब झाला आहे. पण त्यांना जे करायचे ते त्यांनी करावं. आम्हाला जे काही उत्तर द्यायचे आहे ते सभागृहातच देऊ. थोडा धीर धरा. आम्ही सुद्धा सौ सुनार का एक लोहार की! लवकरच करू अशी प्रतिक्रिया दिल्याने बिहारमधील भाजपमधील नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

बिहारसह देशभरात छापेमारी :
सीबीआयचे वेगवेगळे पथक बिहारसह देशभरात दोन डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकत आहेत. रेल्वेतील नोकरी घोटाळ्यातील कथित जमिनीची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. सीबीआयने ज्या आरजेडी नेत्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत, ते बहुतेक माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे आहेत. या घोटाळ्यात सीबीआयने लालू, राबडी देवी आणि इतरांची नावे आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bihar Political Crisis after ED CBI raided check details 24 August 2022.

हॅशटॅग्स

#Bihar Political Crisis(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x