21 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

BMC Election 2022 | भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार, उद्धव ठाकरे भाजपाला धक्का देणार?

Raj Thackeray

Raj Thackeray | शिवसेना फुटीनंतर आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप नेत्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गाठीभेटी वाढल्याचं पाहायला मिळतंय. पहिले देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, विनोद तावडे आणि आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या बैठकीमुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. यानंतर अनेक राजकीय समीकरणे तयार होताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष मनसेसोबत युती करणार का अशी चर्चा पुन्हा रंगली आहे. भाजप पक्षाला मुंबईत मराठीची राजकीय किनार नसल्याने भाजपचे नेते प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरेंच्या भेटी घेऊन राजकीय वातावरण निर्माण करतात. वास्तविक मराठी मतदार सुद्धा मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान करत नाही हे आकडेवारीतून सिद्ध झालेले वास्तव आहे. मात्र मैत्रीच्या नावाखाली राज ठाकरे त्याच त्याच चुका प्रत्येक निवडणुकीत करतात आणि ते चिरंतर सुरु आहे. २०१४ मध्ये सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर नितीन गडकरींची भेट घेतल्यानंतर ‘आगे आगे देखिये होता हैं क्या’ असे डायलॉग मारणाऱ्या राज ठाकरेंनी मोदींना जाहीर समर्थन देऊनही निवडणुकीत मोठा राजकीय फटका बसला होता. त्यानंतरही शिवसेनेला लोकसभेत फटका बसल्यानंतर ‘एक मारा लेकिन शॉल्लेट मारा’ असा जोशमध्ये डायलॉग मारून मराठी मतदारांमध्ये “मराठी मतं’ फोडणारा नेता अशी राजकीय प्रतिमा करून घेतली होती.

राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे मी आधीपासूनच हिंदुत्वाचा आवाज दिला आहे, मात्र मराठी मतदार तेव्हाही हिंदूच होते आणि असं असताना सुद्धा त्यांनी कधीच मनसेला मतदान केलं नाही. ठराविक ठिकाणी हे मतदान होतं ते केवळ पक्ष राजकीय दृष्ट्या जिवंत आहे हे सांगण्यापुरतंच मर्यादित असतं.

त्यामुळे मराठी, हिंदी भाषिक, गुजराती-मारवाडी मतदार मनसेच्या कधीच जवळ नव्हते. परंतु, भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकी उत्तर भारतीय लोकांमध्ये वेगळाच संदेश देण्याची शक्यता आहे. उद्या शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय समाजात शिस्तबद्ध संदेश पोहोचविल्यास हा मतदार भाजपपासून दूर जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप मनसेला सोबत घेणार किंवा मैत्रीपूर्ण लढती करो, पण भाजपाला मत म्हणजे राज ठाकरेंना मत हा संदेश उत्तर भारतीयांमध्ये गेल्यास मोठ्या प्रमाणात मत शिवसेनेकडे फिरण्याची शक्यता आहे. यावर शिवसेनेची टीम कसं काम करणार ते पाहावं लागणार आहे. आता भाजप याभेटी गाठी नाकारू शकत नाहीत आणि मनसेने बहुमत चाचणीत सुद्धा भाजपाला समर्थन दिल्याने ते अधिक अडचणीत आहेत. त्यामुळे शिवसेना राजकीय दृष्ट्या हा विषय कसा पेटवतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बिहारमधील राजकीय उलथापालत :
त्यात बिहारमधील राजकीय उलथापालतमुळे मुंबईतील बिहारी मतदार देखील भाजपविरोधात जाण्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. कारण लवकरच नितीश कुमार सुद्धा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्याचा प्रत्यय पुढच्या महिन्याभरातच येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर स्वतः उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका निवणुकीच्या तोंडावर नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी फोनवर संपर्क साधल्यास या बिहार नेत्यांच्या आवाहनानंतर मुंबईत मोठी राजकीय उलथापालथ होईल आणि दुसऱ्या बाजूला त्याचे पडसाद यूपीतील मतदारांमध्ये सुद्धा उमटतील आणि त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेनेला होऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP leaders meeting with Raj Thackeray check details 30 August 2022.

हॅशटॅग्स

#Neeraj Thackeray(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x