12 May 2025 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

Loksabha 2024 | संपूर्ण बिहार एकवटला! प्रदेश में दिखा, देश में दिखेगा नारा देत नितीशकुमार दिल्लीपासून देशभर भेटीगाठी घेणार

Loksabha Mission 2024

Loksabha Mission 2024 | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीएशी नुकतेच संबंध तोडल्यानंतर अचानक भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेतले आहे. इतकंच नाही तर त्यांनी मिशन-2024 देखील सुरु केलं आहे. अलिकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पाटणा येथे भेट दिली होती आणि दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. आता अशी बातमी समोर येत आहे की, नितीश कुमार मिशन-2024 साठी आणि स्वत: ला प्राथमिक स्तरावर लॉन्च करण्यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीला जाऊ शकतात. पाटणा येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि परिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुढील आठवड्यात बिहारबाहेर जाऊन मिशनला धार देतील, असे जनता दल-युनायटेडच्या (जद-यू)च्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे.

आधी दिल्लीला आणि नंतर टप्प्याटप्प्याने देशभर :
आधी दिल्लीला जाणार असून नंतर टप्प्याटप्प्याने हरियाणा, राजस्थान आणि देशाच्या अन्य भागात जाण्याचा विचार करणार असल्याचे जदयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. नितीशकुमार काही दिवस दिल्लीत विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन भविष्यातील वाटचालीची आखणी करणार आहेत.

विविध पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेणार :
विविध पक्षातील अनेक नेत्यांना त्यांची भेट घ्यायची आहे आणि भविष्यातील कृतीबद्दल चर्चा करायची आहे. २०१५ मध्ये बिहारमध्ये दणदणीत विजय मिळवून भाजपचा पराभव होऊ शकतो, हे दाखवून देणारे ते नेते आहेत. 2022 मध्ये त्यांनी बिहारमध्ये कोणत्याही मित्रपक्षाशिवाय भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आता सर्व प्रादेशिक पक्षांना एकाच छत्राखाली आणण्याचे काम करून भाजपला एकाकी पाडण्याचे आणि त्यांचा खोटारडेपणा उघड करण्याचे काम ते करणार आहेत. सर्वच प्रादेशिक पक्षांच्या फायरिंग रेंजमध्ये भाजप आहे.

आगज़ हुआ, बदला होगा; प्रदेश में दिखा, देश में दिखेगा’ बॅनर्स :
मिशन-2024 संदर्भातील जदयूचे पोस्टर्स बिहारची राजधानी पटनाच्या रस्त्यांवर झळकू लागले आहेत. नितीश कुमार यांचा फोटो आणि जदयूच्या कार्यालयात “आगज़ हुआ, बदला होगा; प्रदेश में दिखा, देश में दिखेगा’ अशा घोषणा देणारे बॅनर लावले जातात.

मोठ्या विरोधी आघाडीसाठी रोडमॅप तयार :
जदयूच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर पाटणा येथे झालेली बैठक मोठ्या विरोधी आघाडीसाठी रोडमॅप तयार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरली आणि आता त्या दिशेने काम सुरू करण्याची वेळ आली आहे. केसीआर यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी २० मिनिटे स्वतंत्र संवाद साधला. २०२४ मध्ये प्रबळ आणि एकसंध विरोधकांच्या प्रचारमोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी पक्ष नितीश कुमार यांच्या नावाला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे.

प्रस्तावित आघाडीतील सर्व पक्षांशी सल्लामसलत :
मात्र, प्रस्तावित आघाडीतील सर्व पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतरच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल, असे केसीआरने स्पष्टपणे नमूद केले. जदयूच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना सर्वोच्च पदासाठी सर्वात सक्षम घोषित केले असून राजद त्याला पाठिंबा देत आहे.

सक्षम पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वकाही :
जदयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले, “नितीशकुमार यांच्याकडे सक्षम पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वकाही आहे. अनुभव असो, प्रशासकीय कौशल्य असो किंवा भारतस्नेही सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल, बिहारमध्ये गेली १८ वर्षे मुख्यमंत्री म्हणून हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. ते पुढे म्हणाले की, नितीश कुमार यांनी स्वत: म्हटले आहे की, त्यांचे प्राधान्य पंतप्रधान-उमेदवार बनण्याला नाही, तर भारताला नवीन पंतप्रधान देणे आहे. नितीश कुमार हे ओबीसी नेते, सुशासन बाबू अशी प्रतिमा, परिवार वादाचा मुद्दा नाही, समाजवादी आंदोलनातील अनुभवी नेते, विरोधक कोणताही नकारात्मक मुद्द्याचा इतिहास नाही आणि संपूर्ण उत्तर भारतात हिंदी भाषिक पंतप्रधान करण्याची लाट आणू शकेल असा चेहरा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Mission 2024 Bihar CM Nitish Kumar will move outside of Bihar for political fielding check details 02 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Loksabha Mission 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या