
Stocks to Buy | सध्याच्या सणासुदीच्या काळात आपण जर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर अॅक्सिस सिक्युरिटीजने आपले टेन्शन कमी केले आहे. तज्ज्ञांनी 5 स्टॉक्सची यादीच जाहीर केली आहे, जे पुढील येणाऱ्या काळात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतील.
भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा कोविडच्या जाळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. महागाईही पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे. अशा परिस्थितीत पुढे येणाऱ्या काळात शेअर बाजारात चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. अॅक्सिस ब्रोकरेज फर्मने पुढील काळात चांगली कामगिरी करू शकतील अशा 100 शेअर्सची यादी जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊय कोणते आहेत त्यातील टॉप स्टॉक :
मारुती सुझुकी :
मागील अनेक वर्षांपासून कार उद्योगात वर्चस्व गाजवणारी भारतातील एक प्रसिद्ध कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. या कंपनीच्या नवीन उत्पादनांमुळे आणि बाजारातील उच्च मागणीमुळे, ब्रोकरेज फर्मला आशा आहे की हा ऑटो स्टॉक येणाऱ्या काळात जबरदस्त वाढेल. अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, हा शेअर पुढील काळात 9801 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकला त्याला ‘बाय’ (खरेदी) असा टॅग दिला आहे.
बजाज फायनान्स :
ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, या शेअरच्या कामगिरीत सुधारणा दिसून येत आहे. यामुळेच ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘बाय’ (खरेदी) रेटिंग दिली आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, बजाज फायनान्सचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 8250 रुपयांच्या पातळीवर जाण्याचा अंदाज आहे.
SBI कार्ड :
ब्रोकरेज फर्म ने आपल्या नोट्समध्ये दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की SBI कार्डच्या व्यवसायात जबरदस्त सुधारणा होण्याचे संकेत येत आहेत. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डला UPI शी लिंक करण्याच्या प्रस्तावामुळे या स्टॉकवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजने हा शेअर 1050 रुपयेच्या किंमतीवर जाण्याचा अंदाज वर्तवला असून त्यावर ‘बाय'(खरेदी) रेटिंग आहे.
टाटा ट्रेंट :
टाटा ट्रेंट हा टाटा समूहाच्या शेअर्सपैकी एक असून ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा दिला आहे. या टाटा समूहातील शेअरच्या कामगिरीवर तज्ञ आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त पूर्ण विश्वास आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, कंपनीच्या शेअरची किंमत येणाऱ्या काळात 1530 रुपयांपर्यंत उसळी घेऊ शकते. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर खरेदीची शिफारस केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.