पुणे : मागील अनेक महिन्यात पुण्यात प्रचंड प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या आणि शहरातील काॅर्पाेरेट लुट असणाऱ्या अमृततुल्यावर राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे. एकही परवाना न घेता तसेच विना नाेंदणी चहा विक्री करणाऱ्यांच्या विराेधात राज्य एफडीएकडून धडक कारवाई करण्याची जोरदार माेहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, या धडक कारवाईत बुधवार पेठेतील प्रसिद्ध येवले अमृततुल्य तसेच साईबा अमृततुल्यच्या विविध शाखांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे.

मागील काही महिन्यात पुण्यात चहाचे येवले अमृततुल्य प्रसार माध्यमांवर चर्चेला आले होते. अनेक थीम्स तसेच सामान्य ग्राहकाला आकर्षिक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्य टॅगलाईनमुळे पुण्यात विविध ब्रॅंण्डचे अमृतुल्य असे नामकरण सुरु झाले आहेत. संपूर्ण दिवस या अमृततुल्यवर ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. दरम्यान, प्रसार माध्यमांनी उचलून धरल्याने हे ब्रॅण्ड इतके लोकप्रिय झाले की यांच्या अनेक शाखा शहरात तसेच जिल्हाच्या विविध भागांमध्ये सुरु झाल्या आहेत.

विशेष म्हणजे बोलायला चहा असली तरी प्रति दिन लाखाेंचा गल्ला या माध्यमातून हाेत आहे. या अमृतुल्यमुळे पुणे शहर आता चहाचे कॅपिटल बनत चालले आहे. परंतु, असं असताना सुद्धा विना नाेंदणी तसेच विना परवाना चहा विक्री करणाऱ्या अमृतुल्यवर एफडीने आता धडक कारवाई सुरु केली आहे. राज्य अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत जनहित व जनआराेग्य याच्या दृष्टीकाेनातून अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध अमृतुल्यवर कारवाई करण्यात आली आहे.

state fda department took action on famous tea shops in pune