1 December 2022 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Surya Rashi Parivartan | या 3 राशीच्या लोकांनी 16 डिसेंबरपासूनचा काळ सांभाळून पार करावा, कोणत्या राशी पहा RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या
x

Multibagger Penny Stocks | सलग 4 अप्पर सर्किटमुळे 1 महिन्यात 90 टक्के परतावा, या 8 रुपयाच्या शेअरच्या खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Multibagger Penny Stocks

Multibagger Penny Stocks | जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, रशिया युक्रेन युद्ध, चीन आणि तैवान यांच्यातील तणाव आणि चलनवाढ समस्या असे टेन्शन असूनही भारतीय शेअर बाजाराने मागील एका वर्षात आपल्या जबरदस्त मोठ्या प्रमाणात मल्टीबॅगर स्टॉक्स दिले आहेत. गुंतवणूकदार अक्षरशः अश्या स्टॉक वर तुटून पडतात, कित्येक दिवस या स्टॉक मध्ये अप्पर सर्किट लागलेला असतो.

मल्टीबॅगर पेनी स्टॉक :
जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि चलनवाढीची समस्या, आणि मोठ्या देशातील युद्ध सदृश्य तणाव असतानाही भारतीय शेअर बाजाराने मागील एका वर्षात काही जबरदस्त मल्टीबॅगर स्टॉक आपल्याला दिले आहेत, त्यात काही पेनी स्टॉकचाही समावेश आहे. Integra Essentia शेअर हा त्या मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सपैकी एक आहे जो सातत्याने आपल्या भागधारकांना छप्पर फाड परतावा देत आहे. आणि अलीकडेच या शेअर्सच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये प्रचंड मोठी उसळी पाहायला मिळाली होती. या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने मागील आठवड्यात सलग चारही ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटला स्पर्श केला आहे. म्हणजेच या कालावधीत शेअर्स नी तब्बल 23 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

शेअरची किंमत काय आहे?
Integra Essentia शेअरच्या किंमतत थोडा फार चढ-उतारा पाहायला मिळत असला तरी, शेअर बाजार उघडल्याच्या तासाभरात हा स्टॉक अप्पर सर्किट ला जातो. या स्टॉक ने अप्पर सर्किटमध्येच बंद होऊन 8.05 रुपये इंट्राडे उच्चांकही गाठला. मागील सहा महिन्यांपासून हा शेअर जबरदस्त तेजीत दिसत आहे. आणि मागील चार ट्रेडिंग सेशनमध्ये 6.75 रुपये प्रति शेअरवरून 8.05 रुपये स्तरांवर जाऊन पोहोचला आहे. या आठवड्यात सोमवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद होता.

एका महिन्यात 90 टक्के परतावा :
हा एक असा पेनी स्टॉक आहे ज्याने मागील एका महिन्यात 4.25 रुपये वरून 8.05 रुपये पर्यंत उसळी घेतली आहे. या स्टॉक मध्ये सुमारे 90 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक मागील सहा महिन्यांत प्रति शेअर 1.67 रुपयेच्या पातळीवर ट्रेड करत होता तो आता 8.05 प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत स्टॉक च्या किमतीत जवळपास 380 टक्क्यांची वाढ झाली आहे. NSE वर स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8.05 रुपये आहे. म्हणजेच मागील चार ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर गेला आहे. Integra Essentia स्टॉकचा NSE वर 52 आठवड्यांची नीचांक किंमत 1.67 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Penny Stocks Integra Essentia share price return on 20 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x