8 May 2024 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

मुख्यमंत्री पदी शिंदे तर फडणवीस गृहमंत्री | हिंदुत्वाच्या नावाखाली शिंदे गटातील उन्मत्त आमदाराकडून गर्दी असताना गोळीबार

MLA Sada Sarvankar

MLA Sada Sarvankar | आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पोलिसांवर दबाव आणून कुणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्याचा तपास करतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या भागातील आमदार असल्याने हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा त्यांनी सांगितले. आपण कामातून मोठे झालेलो आहोत, भांडणे करुन मोठे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात असे वाद करु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांना मदत करण्यासाठी, त्यांनी चौकशीला बोलावले तर जाऊ असेही त्यांनी सांगितले.

सदा सरवणकर काय म्हणाले :
माझ्याकडे लायसन्सची पिस्तूल आहे. पण माझ्याबरोबर पोलीस फौज असताना मला अशाप्रकारची काय गरज आहे? बंदुक हातात घेतलेला जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्याबाबत मला काहीच कळत नाही. सोशल मीडिया हा माझा अज्ञानाचा भाग आहे. मी तशाप्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही. पोलिसांवर कुणी दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास सांगत असतील तर पोलीस योग्य तपास करतील. मी जे गुन्हे केले नाहीत ते दाखल करणे योग्य नाही”, असं आमदार सदा सरवणकर यांनी सांगितलं.

पोस्टर फाडून, दगडफेक करुन माझे काम संपवता येणार नाही, असेही सरवणकर यांनी म्हटले आहे. यामागे बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यांनी केले आहे. अशा प्रकारचा उद्रेक करण्यापेक्षा एकमेकांना कामाने जिंकू, असे विरोधकांना सदा सरवणकर यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध आर्म्स अॅक्टमधील ३/२५, १४२, १४३, १४४, १४६, १८६, ३३६ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा :
सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. गोळीबार करून आमच्याच लोकांवर गुन्हा दाखल केला. पोलीस देखील त्यांचंच ऐकत आहे. आमच्या लोकांनी त्यांच्या अगोदर तक्रार करून सुद्धा पोलिसांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. तपास न करता थेट 395 सारखा दरोड्याचा कलम लावला. त्यामुळे 395 सारखा कलम त्यातून काढण्यात यावं आणि सदा सरवणकर यांच्यावर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका अरविंद सावंत यांनी घेतली होती.

दरम्यान, मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला खरा मात्र आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील घातक कलम 395 वगळलं गेलंय तर आमदार सदा सरवणकर,समाधान सरवणकर यांच्याविरोधात अखेर गुन्ह्याची नोंद झाली आहे. मात्र,यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह स्मिता महेश सावंत यांच्यावर जहरी टीका केली आहे. खोटी कामं करायचे धंदे बंद करा असा थेट इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MLA Sada Sarvankar Vs Shivsena at Dadar check details 11 September 2022.

हॅशटॅग्स

#MLA Sada Sarvankar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x