
PPF Investment | पीपीएफ योजना ही एक गॅरंटीड रिटर्न स्कीम म्हणून ओळखली जाते. ही सरकारी योजना शेअर बाजारातील अस्थिरतेपासून स्वतंत्र असल्यामुळे गुंतवणूक केल्यास हमखास परतावा मिळतो. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवू शकतो.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
आजच्या युगात, तरुणांना लहान बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व फारसे समजत नाही. पण अशीच छोटी छोटी बचत आपल्या भविष्यातील सर्व आर्थिक गरजा पूर्ण करू शकते. जर आपण आपल्या दैनंदिन खर्चातून थोडे पैसे बचत केले आणि PPF योजनेत गुंतवणूक केले तर दीर्घ मुदतीत तुम्ही चक्रवाढ व्याज पद्धतीने खूप मोठा परतावा कमवू शकता. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना तुम्हाला गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवून देऊ शकते. जर तुम्ही दररोज फक्त 250 रुपये PPF योजनेत गुंतवण्यास सुरुवात केली तर, 7500 रुपये मासिक प्रमाणे तुम्हाला या योजनेच्या मॅच्युरिटीवर 24.40 लाख रुपयेचा हमखास परतावा मिळेल.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीचे लक्ष असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय आहे. 15 वर्षांच्या परिपक्वता कालावधीमुळे, ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला आणि बचतीला प्रोत्साहन देते. दुसरीकडे, या सरकारी योजनेत पैसे जमा केल्यास सुरक्षेची हमी आणि हमखास परतावा उपलब्ध मिळतो. लोक अनेक कारणांसाठी किंवा आर्थिक उद्दिष्ट लक्षात ठेऊन गुंतवणूक करत असतात. मुलांचे शिक्षण, लग्नापासून ते निवृत्तीपर्यंत अनेकजण PPF सारख्या अल्पबचत गुंतवणूक योजनेत पैसे जमा करत असतात.
दररोज 250 रुपयांच्या बचतीतून 24 लाख परतावा कसा मिळू शकतो, ह्याचा संपूर्ण हिशोब :
* दैनिक अंदाजे बचत : 250 रुपये
* मासिक अंदाजे बचत : 7500 रुपये
* वार्षिक बचत आणि गुंतवणूक : 90,000 रुपये
* व्याज दर : 7.1 टक्के वार्षिक
* चक्रवाढ व्याज परतावा रक्कम : 24.40 लाख रुपये * एकूण गुंतवणूक: 13.50 लाख रुपये
* व्याज परतावा :19 लाख रुपये
पीपीएफ योजनेचे फायदे :
* पीपीएफ योजनेचा व्याज दर वार्षिक 7.1 टक्के आहे. हा व्याजदर बँकेच्या इतर मुदत ठेवीं योजने खूप जास्त आहे.
* PPF ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना असल्याने त्यावर चक्रवाढ व्याज परताव्याचा लाभ दिला जातो.
* PPF योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते.
* एका वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक केली जाऊ शकते.
* पीपीएफ ठेवींवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा हे करमुक्त असते.
* PPF खातेधारकाला खाते उघडण्याच्या एक वर्ष कालावधीच्या समाप्तीनंतर त्याच्या ठेवींवर कर्ज देखील घेता येते.
* पीपीएफ ठेवींवर सार्वभौम हमी असते. याचा अर्थ असा की तुमचे पैसे सुरक्षित असतील, तर परताव्याची हमी असेल.
* जर PPF खातेधारक कोणत्याही कर्जात डिफॉल्ट सिध्द झाला, तर त्याच्या PPF खात्यात जमा केलेली रक्कम कोणत्याही न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा डिक्रीनुसार जप्त केली जाऊ शकत नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.