Viral Video | तुम्ही कधी असा विचार केला आहे का, अचानक तुमच्या समोर कोणी आकाशात उडायला लागले, ना त्याने पॅराशुट बांधले आहे ना आणि काही मात्र तो आकाशात उडायला लागला. तेव्हा ते किती भितीदायक असेल. असाचं एक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये एक मुलगी हवेमध्ये तरंगत आहे. हा व्हायरल व्हिडिओ अमेरिकेमधील असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे लोक हॅलोविनच्या तयारीत व्यस्त आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे हॅलोविन म्हणजे नेमके काय? भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये जसा पितृपक्ष पाळून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे तसेच अमेरिकेमध्ये व सर्वत्र ख्रिस्ती बांधव हॅलोवीन साजरा करतात. दरवर्षी 31 ऑक्टोबर दिवशी हॅलोविन (Halloween) सन साजरा केला जातो. तर दुसरीकडे हा असा प्रकार उघडकीस आला आहे. तर चला जाणून घेऊ मुलगी हवेत तरंगली कशी?

हवेत तरंगणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिले असेल, जेव्हा हिरो किंवा व्हिलेन हवे मध्ये उडतो मात्र त्यांची शुटींग दरम्यान तेवढी काळजी घेतली जाते. त्यांना रोपच्या सहाय्याने हवेत तरंगण्यास साहाय्यता होते. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी कोणताच सहारा न घेता हवेमध्ये तरंगत आहे. हे दृश्य पाहून लोक विचारांमध्ये पडले आहेत. हे घडलं तरी कसं?

दोन्ही हात उंच करून मुलगी हवेमध्ये तरंगत आहे
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी कश्याचाही आधार न घेता हवेमध्ये तरंगत आहे. तिचे दोन्ही हात तिने वर उंच केले आहेत आणि ती हवेमध्ये उडत आहे. हॅलोविन येण्यास अजून बराच वेळ आहे आणि यावेळी येथील थीम नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय वेबसिरीज स्ट्रेंजर थिंग्सवर आधारित आहे असणार आहे. हे लक्षात घेऊन एका जोडप्याने येथे तयारीला सुरूवात केली आहे. हवेत डोलणाऱ्या मुलीचा हा व्हिडिओ डेव्ह आणि ऑब्रे यांनी नुकताच टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता आणि इथून पुन्हा तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ दीड लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर या व्हिडिओवर नेटिझन्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of the girl flying in the air trending on social media checks details 25 September 2022.

Video Viral | मुलगी अचानक आधाराशिवाय हवेत तरंगू लागली, अमेरिकेत नेमकं चाललंय काय?, व्हिडिओ प्रचंड व्हायरल