मुंबईः काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, ‘पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन केलं आहे.
काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी ट्विट मध्ये;
#Pulwama #KashmirTerrorAttack
पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे. @narendramodi— Raj Thackeray (@RajThackeray) February 14, 2019
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		