28 April 2024 11:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

रमेश वाळूंज यांची पत्नी कल्पना वाळूंज यांनी आशिष शेलार आणि भाजपची पोलखोल केली, भाजपने मुंबईकरांना खोटी माहिती दिली

Ramesh Walunj

MLA Ashish Shelar | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही जोरदार निशाणा साधला होता. मुंबईवर जेव्हा संकटं येतात तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर असतो, पण भाजपवाले कुठे असतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता. 26 जुलैचा पूर असो किंवा 26/11 चा हल्ला संकटाच्या काळात शिवसैनिक रस्त्यावर येतो आणि मुंबईकरांची मदत करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं होतं. भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

त्यावेळी बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपाचा होता असा दावा आशिष शेलार यांनी केला होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले, असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. मात्र आता स्वर्गीय रमेश वाळूंज यांची पत्नी कल्पना वाळूंज यांनी आशिष शेलार आणि भाजपाची पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली आहे.

कल्पना वाळूंज काय म्हणाल्या :
स्वर्गीय रमेश वाळूंज यांची पत्नी कल्पना यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलार यांनी केलेल्या दाव्याबाबत त्यांनी खुलासा केला. त्या म्हणाल्या, माझे पती जन्मापासूनच शिवसैनिक होते. ते कामावरून आले की शिवसेना शाखेत जायचे. ते कधीच भाजपमध्ये गेले नाहीत. त्यामुळे हे खोटे आहे की ते भाजपचे कार्यकर्ता होते, असं वक्तव्य कल्पना यांनी केलं.

आमच्या घरी त्यावेळी उद्धवसाहेब, अनिल परब साहेब येऊन गेले होते. आशिष शेलार आमच्या घरी कधी आले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. आशिष शेलार आमच्याकडे आले नाहीत. मात्र, रमेश वाळूंज यांच्या निधनानंतर शेलार यांनी 5 लाख रुपयांची मदत पाठवली होती, पण याचा अर्थ असा होत नाही की माझे पती भाजपात होते अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

रमेश वाळूंज हे अखेरपर्यंत शिवसैनिकच होते :
रमेश वाळूंज हे कायम, अखेरपर्यंत शिवसैनिकच होते, असं कल्पना यांनी स्पष्ट केलंय. मुंबईवर संकट येतं तेव्हा भाजप कुठे जाते, असा सवाल उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ramesh Walunj wife Kalpana Walunj rejected political claim of MLA Ashish Shelar over band stand incident 30 September 2022.

हॅशटॅग्स

#Ramesh Walunj(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x