7 May 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

आधीच कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेमुळे सत्तापालट होण्याचे संकेत, त्यात भाजपच्या मंत्र्याचा उन्माद, महिलेला सर्वांसमोर कानशिलात मारली

BJP India

BJP Karnataka | कर्नाटकात एका मंत्र्याने सार्वजनिक ठिकाणी महिलेला थप्पड मारल्याचं प्रकरण जोर धरत आहे. विरोधी पक्षांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्याचे पायाभूत सुविधा मंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. सोमन्नाने या महिलेला तिच्या संबंधित तक्रार करण्यासाठी आली असता महिलेला कानशिलात मारली होती.

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. माहितीनुसार, जमिनीच्या मालकी हक्कासाठी एक महिला आपली तक्रार घेऊन मंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे पोहोचली होती. दरम्यान, एखाद्या गोष्टीवरून मंत्र्यांची मन:स्थिती बिघडली आणि त्यांनी महिलेला चापट मारली.

महिला चरण स्पर्श करते
या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. मंत्र्याने कानशिलात मारल्याने तेथे उपस्थित लोकांना अस्वस्थ केले. महिला इतकी साधी होती की अशा परिसस्थितीत देखील तिने मंत्र्यांचे पाय धरले आणि मग ती विनवणी करत राहिली. मंत्र्याने महिलेवर राग का दाखवला हे अद्याप समजू शकलेले नाही.

काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
‘एकीकडे ४० टक्के कमिशनसारख्या घोटाळ्याचा फटका लोकांना सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे सत्तेच्या नशेत असलेले मंत्री महिलेला थोबाडीत मारत आहेत. आमचे पंतप्रधान कुठे आहेत? मुख्यमंत्री बोम्मई मंत्रिपदाची हकालपट्टी करणार का?” असं काँग्रेसने म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka BJP state minister slapping woman video viral on social media check details 23 October 2022.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x