13 December 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

गद्दारांविरोधात शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट | श्रीकांत शिंदे पासून अनेकांच्या कार्यालयांची तोडफोड

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला झटका बसण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर विधानसभा उपाध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रक्रिया सुरू केली आहे असून, १६ आमदारांना नोटिसा बजावली आहे. शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड :
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालय शिवसैनिकांनी फोडले आहे.

शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट :
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून निदर्शनं करत आहे तर कुठे पुतळे जाळत आहे. आता या शिवसैनिकांच्या उद्रेकाचा फटका एकनाथ शिंदे यांच्या मुलाला बसला आहे.

तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड :
आज सकाळी शिंदे समर्थक आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली. पुण्यातील बालाजी नगर भागात सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसैनिकांनी लक्ष्य केलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel against Shivsena now reaction from Shivsainik check details 25 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x