7 May 2021 10:43 AM
अँप डाउनलोड

वेगळ्या विदर्भसाठी मतदान करणारे फडणवीस आता बेळगावात मराठी लोकांच्या विरोधात प्रचाराला

karnataka Maharashtra, Belgaum

बेळगाव, १५ एप्रिल: बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेनंतर आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असा तुफान सामना रंगण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी काल (१४ एप्रिल) आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र, उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते बेळगावात गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरही बेळगावात पोहोचल्या आहेत.पंढरपूर येथे भगीरथ भालके यांचा प्रचार केल्यानंतर बेळगावात शिवसेनेच्या साथीला राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर पोहोचल्या आहेत. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता चक्क महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेस विरोधात प्रचार करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. फडणवीस भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा करणार प्रचार करणार आहेत. हिंडीलगा येथे देवेंद्र फडणवीस जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आज सायंकाळी 7 वाजता प्रचार संपणार आहे आणि 17 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी होत आहे तिरंगी लढत हाये. शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्रातील पक्षांनी प्रचार केला आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis has arrived in Belgaum for the Belgaum Lok Sabha by-election campaign. Fadnavis will campaign for BJP candidate Mangala Angadi. Devendra Fadnavis will address a public meeting at Hindilga.

News English Title: Devendra Fadnavis in Bemgaum for campaign of BJP candidate news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(597)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x