 
						Aaadhaar Card Toll Free | प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असने बंधनकारक झाले आहे. शासकीय अथवा इतर अनेक कामांमध्ये आधाक कार्ड विचारले जाते. मात्र आजही अनेक व्यक्तींना आधारच्या विविध समस्या आहेत. यामुळे अनेकांची कामे रखडून राहतात. तसेच ही कामे करण्यासाठी मोठी प्रोसेस करावी लागते. मात्र आता ही समस्या एका मिनीटात सोडवण्याची शक्कल मिळाली.
४ अंकी क्रमांक डायल करा :
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर फक्त एक ४ अंकी क्रमांक डायल करावा लागेल. UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. यात तुम्हाला १२ भाषांमध्ये सेवा पुरवली जाणार आहे. १९४७ हा चार अंकी क्रमांक तुमच्या फोनमध्ये डायल केल्यावर तुम्हाला तुमच्या समसेस्येचे निरासरण करता येईल.
UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत याची माहीती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आधार कार्डशी संबंधीत तुमच्या सर्व समस्या एका फोन कॉलवरून मिटू शकतात. यासाठी तुम्हाला कोणत्याही आधार केंद्राला भेट देण्याची आवश्यकता नसते. १९४७ हा हेल्पलाइन क्रमांक तुम्हाला १२ भाषांमध्ये सेवा पुरवतो. यात मारठी, हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, गुजराती, पंजाबी, उडीया, बंगाली, आसामी, उर्दू, इंग्रजी अशा भाषांचा समावेश आहे. #Dial1947ForAadhaar सर्च करुन तुम्ही तुमच्या आवडत्या भाषेत बातचीच करू शकता.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण मार्फत हा नंबर प्रसारीत झाला आहे. यात तुम्ही हवी ती भाषा निवडू शकता. १९४७ हा क्रमांक लक्षात ठेवणे देखील अगदी सोपे आहे. कारण हा क्रमांक म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालेले वर्ष आहे. हा क्रमांक २४ तासांची सेवा पुरवतो. तसेच यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच यावर काम करणारे कॉलसेंटर कर्मचारी सोमवार ते शनिवार स. ७ ते रा. ११ वाजेपर्यंत काम करत असतात.
याचा वापर करताना तुम्हाला आधार आणि केंद्र क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर याच्या सेवेचा लाभ घेता येतो. तसेच तुमचे आधार कार्ड पोस्टामार्फत अद्याप तुम्हाला मिळाले नसेल तर त्याची माहिती तुम्ही या क्रमांकावर मिळवू शकता. शिवाय आधार कार्ड गहाळ झाल्यास देखील या क्रमांकावर तक्रार नोंदवता येते.
यासह आता आधार कार्ड पीवीसी स्वरूपात देखील उपलब्ध आहे. यात तुम्हाला यूआयडीएआय सर्च करावे लागेल. त्यानंतर माय आधारमधील ऑर्डर आधार पीवीसी कार्ड निवडावे. पुढे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक, १६ अंकी वर्च्युअल क्रमांक, २८ अंकी इआयडी प्रविश्ट करावा लागेल. त्यानंतर कॅप्चा आणि सिक्यूरीटी कोड तसेच फोनवर आलेला ओटीपी ही प्रोसेस पुर्ण करावी लागते. हे सर्व झाल्यावर तुम्हाला ऍप्लीकेशन सबमीट झाल्याचा मॅसेज येतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		