13 May 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
x

Sarkari Scheme | ही सरकारी बचत योजना पती-पत्नील 59,400 रुपयांचा व्याज परतावा देईल, योजनेचे दुहेरी फायदे आणि रिटर्न्स

Post Office Scheme

Post Office Scheme| बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी इंडिया पोस्ट ऑफिस अनेक योजना राबवते. पोस्ट ऑफिसद्वारे एक खास बचत योजना राबवली जाते, ज्याद्वारे पती-पत्नी दोघे मिळून त्यात गुंतवणूक करू शकतात आणि वार्षिक 59,400 रुपये व्याज सहज कमवू शकतात. या योजनेचे नाव आहे, “पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम”. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा निश्चित व्याज परतावा कमवू शकता. जर तुम्ही मासिक कमाईची गणना केली तर ती अंदाजे दरमहा 4950 रुपये असू शकते. इंडिया पोस्ट ऑफीस च्या या अल्पबचत योजनेत तुम्ही संयुक्त खाते देखील उघडून बचत करू शकता. या योजनेत तुम्ही दुहेरी लाभ कसा मिळवू शकता, याची माहिती घेऊ

एमआयएस योजना : इंडिया पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत तुम्हाला एकल किंवा संयुक्त खाते उघडण्याची सुविधा दिली जाते. वैयक्तिक खाते उघडल्यास तुम्ही या योजनेत किमान 1,000 रुपये आणि कमाल 4.5 लाख जमा करू शकता. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर त्यात तुम्ही कमाल 9 लाख रुपये जमा करू शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक या योजनेचा जास्त लाभ घेऊ शकतात. ही अल्पबचत योजना अतिशय सेवानिवृत्त लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

योजनेचे लाभ व फायदे : इंडिया पोस्ट च्या MIS योजनेचे खास वैशष्ट्ये म्हणजे तुम्ही यात एकल खाते उघडू शकता, शिवाय दोन किंवा अनेक लोक मिळून एक संयुक्त खाते देखील उघडू शकतात. या खात्यातील गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदाला समान वाटप केले जाते. तुम्ही कधीही संयुक्त खाते विभाजित करून तुमचे वेगळे एकल खाते उघडू शकता. किंवा तुमचे एकल खाते कधीही संयुक्त खात्यात रूपांतरित करता येते. तुमच्या चालू बचत खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी, सर्व सदस्यांनी एक संयुक्त अर्ज देणे गरजेचे आहे.

योजना कशी काम करते? : या योजनेत गुंतवणूक केल्यास सध्या तुम्हाला 6.6 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जाईल. या योजनेअंतर्गत, तुमच्या एकूण ठेवींवरील वार्षिक व्याज दराने परतावा मोजला जाईल. त्यामुळे प्रत्येक महिन्यानुसार व्याजाचे 12 भाग केले जातील. तुम्ही हा व्याजाचा भाग तुमच्या खात्यात दर महिन्याला जमा केला जाईल. जर तुम्हाला मासिक आधारावर व्याज हवा नसेल तर ही रक्कम तुम्ही मूळ रकमेत जोडू शकता, आणि त्यावरही व्याज मिळवू शकता.

व्याज परतावा गणना : समजा या योजनेंतर्गत पती-पत्नीने संयुक्त खात्यात 9 लाख रुपये जमा करून गुंतवणूक केली आहे. 9 लाख ठेवींवर त्यांना 6.6 टक्के व्याजदराने 59400 रुपये वार्षिक व्याज परतावा मिळेल. जर हा वार्षिक व्याज परतावा 12 भागांमध्ये विभागला तर खातेदारांना मासिक 4950 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला या खात्यातील गुंतवणुकीवर दरमहा 4950 रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, तुमची मुद्दल रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील आणि तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ही योजना दर 5 वर्षांनी वाढवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Scheme of Monthly saving scheme for high interest returns on 27 October 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x