१४ फेब्रुवारी २०१९ रोजी CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० भारतीय जवान मारले गेले आणि देशभर संतापाची एकच लाट पसरली. देशातील प्रत्येकाने या हल्ल्याचा निषेध करून पूर्ण देश शहिदांच्या कुटुंबियांच्या मागे उभा असल्याचे निक्षून सांगितले आणि या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी भावना देखील व्यक्त केली.

देशातील विविध स्तरातील लोकांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक तसेच शैक्षणिक मदत जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने देखील थोडी पण मदत जाहीर केली. परंतु मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्या नगरसेवक पदासाठी मिळणारे पुढील एक वर्षाचे मानधन पुलवामा येथील शहिद झालेल्या CRPF जवानांना समर्पित केले. हि मदत जरी थोडी असली तरी त्यांनी दाखवलेली भावना हि मोठी आहे आणि त्यांच्या या कार्याला लक्षात घेऊन इतर राजकारण्यांनी देखील शहीद जवानांना मदत केली पाहीजे.

मनसे सध्या विविध स्तरावर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरताना दिसते आहे आणि मनसे संपली असा अपप्रचार करणाऱ्यांना आता मनसेची निवडणुकी आधी धास्ती लागली आहे. “प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त मनसे” हि भावना आता सामान्यांना रुचू लागली आहे आणि त्याचा प्रत्यय म्हणजे लोक आपल्या समस्या घेऊन १ आमदार आणि १ नगरसेवक असलेल्या राज ठाकरेंकडे वळत आहे.

शेवटी राज ठाकरे यांच्या शिलेदाराला शोभेल अशी मदत मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांनी पुलवामा हल्ल्यातील शाहिद जवानांना केली या बद्दल त्यांचे मनसे अभिनंदन.

MNS Corporator Sanjay Turde donate his 1 year salary for pulwama martyr soldier families