8 May 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Multibagger Stocks | भाऊ निवडाना असे शेअर, 50 हजारांवर 62.50 लाख परतावा दिला, स्टॉक नेम सेव्ह करा

Paushak Share price

Multibagger Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 203.01 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 59959.85 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी 49.80 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी वाढून 17,786.80 अंकावर ट्रेड करत होता. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एकूण 1470 शेअर्स वाढले होते तर, 1868 शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली होती. आणि 114 शेअर्स अपरिवर्तित राहिले होते. शेअर बाजारातून जबरदस्त परतावा कमवायचे असेल तर दीर्घकालीन गुंतवणुक करावी. शेअर बाजारातून दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावता येतो हे आणखी एका शेअरने सिद्ध केले आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12488 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर जाणून घेऊ, या शेअरचे सविस्तर तपशील.

पौषक शेअरची किंमत :
पौषक कंपनीच्या स्टॉकने मागील 10 वर्षांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्टॉकने अतिशय मजबूत रिटर्न कमावून दिला आहे. 26 ऑक्टोबर 2012 रोजी BSE निर्देशांकावर हा स्टॉक 67.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गेल्या आठवड्यात या शेअरची किंमत 8497.35 रुपयांवर पोहोचली होती. या कालावधीत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 12488.67 टक्के नफा कमावून दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांचे पैसे 125 पट अधिक वाढले आहे. शेअरच्या या जबरदस्त कामगिरीमुळे ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 50 हजार रुपये लावले होते,त्यांना आता 62.50 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत मिळालेला परतावा :
पौषक कंपनीचा शेअर 12 मे 2006 रोजी स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी हा शेअर 304.25 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र आता हा स्टॉक 8497.25 रुपयांवर पोहचला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 2,693 टक्के वाढली आहे. मागील 16 वर्षांत ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, त्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 28 पट अधिक वाढले आहेत. ज्यां लोकांनी त्यावेळी 1 लाख रुपये लावले होते त्यांना आता 27.93 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.

5 वर्षात मिळालेला परतावा :
03 नोव्हेंबर 2017 रोजी हा स्टॉक 906.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल या शेअरची किंमत 8497.25 रुपयेवर बंद झाली होती. या कालावधीत स्टॉकमध्ये सुमारे 837.17 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. याचा अर्थ असा की मागील 5 वर्षांत लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्या गुंतवणूकदारांचे पैसे 9.37 पट अधिक वाढले आहेत. आणि त्यांचे 1 लाख रुपये वाढून आता 9.37 लाख झाले आहेत.

उर्वरित काळात मिळालेला परतावा :
पौषक कंपनीच्या स्टॉकने मागील 1 वर्षात आपल्या शेअर धारकांना 26.81 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर धारकांना 22.49 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 4.50 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 2022 या वर्षात स्टॉकमध्ये आतापर्यंत 19.74 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, मागील आठवड्यात हा स्टॉक 1.73 टक्के पडला होता. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 12,400 रुपये आहे आणि नीचांक पातळी किंमत 8199 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 2,612.60 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
ही कंपनी गुजरातमधील अलेम्बिक ग्रुप ऑफ कंपनीचा एक भाग आहे. 1907 साली स्थापन झालेली Alembic Limited ही भारतातील सर्वात जुन्या फार्मास्युटिकल कंपनीपैकी एक आहे. 5 वर्षांपूर्वी या कंपनीने आपला “शतक वर्ष वर्धापन दिन” साजरा केला होता. वर्षानुवर्षे आपला व्यवसाय वाढवून या कंपनीने न्यूट्रिएंट फॉस्जीन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जच्या निर्मितीमध्ये मोठी उत्पादन क्षमता साध्य केली आहे. कंपनीची उत्पादन ताकद पहिली तर तिने 35 वर्षे सुरक्षित फॉस्जीनची हाताळणी केली आहे. कंपनीकडे रासायनिक संश्लेषणाचा 100 वर्षांचा अनुभव असून इन-हाउस R&D आणि प्रक्रिया आणि विकास क्षमता, 5 लाख ते 10 लाख पर्यंत प्रगतीशील स्केल-अप उत्पादनसाठी पायाभूत सुविधा, मजबूत गुणवत्ता आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली आणि खर्च ऑप्टिमायझेशन हे कंपनीचे काही मजबूत मूलभूत तत्त्व आहे. जागतिक स्तरावर मान्य असलेल्या नैतिक चौकटीत राहून व्यापार वृध्दी करणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Paushak Share price return on investment on 31 October 2022.

हॅशटॅग्स

#Paushak Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x