13 October 2024 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

भाजपाची सत्ता पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक महापालिकेत, ते वगळून बीएमसीतील व्यवहारांची कॅगमार्फत चौकशी, शिंदेंवर शंका वाढणार?

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता कोरोनाकाळात मुंबई महापालिकेनं मंजुर केलेल्या विकासकामांच्या आर्थिक व्यवहारांची कॅगमार्फत चौकशी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. सध्या पालिकेचा कार्यकाळ संपल्यानं प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत गेल्या नऊ महिन्यांपासून प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. येत्या काही महिन्यांत महापालिकेची निवडणूक होणार असल्यानं त्याआधीच शिंदे-फडणवीस सरकारनं पालिकेतील कामाच्या चौकशीचे आदेश दिल्यानं शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळं आता या प्रकरणात उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेकडून झालेल्या १२ हजार कोटींच्या कामाची चौकशी करावी अशी विनंती कॅगकडे केली होती. कॅगने राज्य सरकारची विनंती मान्य केली असून, कॅग महापालिकेतल्या संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या कामांची चौकशी करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. विशेष म्हणजे किरीट सोमैयांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नारायण राणे यांच्यासह इतर आमदार, खासदार आणि नगरसेवक हे शिंदे गटात आणि भाजप समर्थक झाल्याने असे विषय पुन्हा भाजपवर परतण्याची शक्यता अधिक आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांचे व्हिडिओ जरी शिवसेनेने दाखवले तरी शिंदे आणि फडणवीसांकडे उत्तर नसेल.

शिंदे-फडणवीसांच्या हेतूवर शंका :
राज्यात अनेक महत्वाच्या महानगरपालिकेत निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपाची सत्ता असलेल्या पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड या महत्वाच्या महापालिका शिंदे-फडणवीसांनी कॅग चौकशीत न घेतल्याने लोकांना शिंदे-फडणवीस यांच्या हेतूवर अधिक शंका येऊ शकते. कारण या महानगरपालिकांनी सुद्धा कोविड काळात अनेक टेंडर काढले होते. पण भाजप केवळ मुंबईवर केंद्रित का आणि शिंदे त्यांना का मदत करत आहेत यावरून शिवसेना हा मुद्दा त्यांच्यावरच उलटवू शकते असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BMC financial transactions will be investigated by CAG CM Eknath Shinde govt decision check details 31 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x