11 May 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Mutual Funds | 3 टॉप म्युचुअल फंड योजना, परतावा 32 टक्के, SIP गुंतवणूकीतून करोडोचा परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा

Mutual fund

Mutual Fund | स्मॉलकॅप म्युच्युअल फंड यांना इक्विटी म्युचुअल फंडांची उप-श्रेणी मानले जातात. स्मॉलकॅप म्युच्युअल फंडातील पैसे स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मुख्यतः ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल 5000 कोटी रुपये पेक्षा कमी आहे, अशा कंपनीच्या शेअर्स मध्ये स्मॉलकॅप म्युच्युअल फंडातील पैसे लावले जातात. किमान 65 टक्के रक्कम अशा कंपन्यांमध्ये लावली जाते, ज्यांची किरकोळ गुंतवणूकदारांना माहिती नसते. स्मॉल कॅप म्युचुअल फंड भरघोस परतावा कमावून देतात यात काहीच शंका नाही, परंतु यात अस्थिरता आणि जोखीम जास्त असते. अल्प आणि मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जास्त तोटा होण्याची शक्यता असते. तथापि, दीर्घकालीन गुंतवणूकीचे उदिष्ट ठेवल्यास जोखीम खूप कमी होते.

स्मॉलकॅप म्युचुअल फंडांचा परतावा :
स्मॉल कॅप म्युचुअल फंड सरासरी वार्षिक 32 टक्के किंवा अधिक परतावा मिळवून देतात. मागील काही वर्षात असे दिसून आले आहे की, स्मॉलकॅप म्युच्युअल फंडांनी सरासरी वार्षिक 32 टक्के परतावा दिला आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या म्युचुअल फंडाने तर सरासरी वार्षिक 52 टक्क्यांपर्यंतही परतावा मिळवून दिला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी उच्च परतावा देणाऱ्या धोकादायक गुंतवणूक योजनेत पैसे लावणे टाळावे. जर तुम्हाला अधिक परतावा कमवायचा असेल तर, स्मॉल कॅप म्युचुअल फंड हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. एखाद्या गुंतवणूकदाराला स्मॉलकॅप म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही या लेखात तुमच्या साठी टॉप-3 म्युचुअल फंडाची माहिती घेऊन आलो आहेत.

अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
Axis Small Cap म्युचुअल फंडने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वर्शिल 28.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही आजपासून तीन वर्षांपूर्वी या फंडात 5000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुम्हाला निव्वळ आधारावर 2.78 लाख रुपये परतावा मिळाला असता. तीन वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये झाली असती, आणि परतावा म्हणून तुम्हाला एक लाख रुपये मिळाले असते. या गुंतवणुकीत तुम्हाला 55 टक्के निव्वळ परतावा मिळाला असता. या म्युचुअल फंड योजनेत 5 वर्षात सरासरी वार्षिक 20 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाची NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 72 रुपयांच्या जवळ आहे. या म्युचुअल फंडाचा आकार 10700 कोटी रुपये असून तुम्ही किमान 100 रुपये जमा करून SIP गुंतवणूक सुरू करु शकता.

SBI स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
SBI स्मॉल कॅप म्युचुअल फंडने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सारारी वार्षिक 30 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी यात 5000 रुपयांची SIP गुंतवणूक केली होती, त्यात आता 2.87 लाख रुपये निव्वळ परतावा मिळाला आहे. तीन वर्षात दरमहा 5000 रुपये या दराने एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये झाली असती, आणि त्यावर 60 टक्के दराने परतावा मिळाला असता. या म्युचुअल फंडाची एकूण NAV 129 रुपये असून या फंडाचा आकार 14500 कोटी रुपये आहे. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपयांपासून SIP गुंतवणूक सुरू करु शकता.

निप्पॉन स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
निप्पॉन स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने गेल्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 35 टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण NAV म्हणजे निव्वळ मलमत्ता मूल्य 101 रुपये असून निधीचा आकार 22 हजार कोटी रुपये पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. या योजनेत तुम्ही किमान 100 रुपयांपासून SIP गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या योजनेत 5000 रुपयेची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर, तुम्हाला आता 3.11 लाख रुपये परतावा मिळाला असता. तुमच्या 1.8 लाख गुंतवणुकीवर 73 टक्के पेक्षा अधिक निव्वळ परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund Scheme for investment and high returns in short term on 04 November 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x