14 December 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

Numerology Horoscope | 05 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. कार्यक्षेत्रातील सहकारी आणि अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. जुन्या मित्रांची भेट संभवते. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 2-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. आपले आरोग्य सामान्य राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

मूलांक 3-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. खर्चाचा अतिरेक होईल. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 4-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करायची असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 5-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ६-
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. क्षेत्र आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ७-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. पूर्वकल्पित कामे पूर्ण होतील. क्षेत्रात व व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्या सुटतील. नशीब साथ देईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 8-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. अतिउत्साहाचे प्रसंग टाळा. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

मूलांक ९-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 05 November 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(532)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x