6 May 2024 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

PPF Scheme | होय! पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना सुद्धा करोड मध्ये परतावा देईल, ही युक्ती समजून घ्या, पैसा वाढवा

PPF Scheme

PPF Scheme | वृद्धापकाळात जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदाने व्यथित करायचे असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. यासाठी आजपासूनच पद्धतशीर गुंतवणूक सुरू करा. जर तुम्ही दर महिन्याला काही पैसे बचत करून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये गुंतवणूक केले तर तुम्ही निवृत्तीपूर्वी करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला PPF मध्ये गुंतवणूक करण्याचे गणित समजून घ्यावे लागेल.

दीर्घकालीन गुंतवणूक :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, जी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक, सुरक्षा आणि मजबूत परतावा हे सर्व फायदे मिळवून देते. ही योजना तुम्हाला दीर्घकाळात चांगले रिटर्न कमावून देऊ शकते. तुम्ही पीपीएफमध्ये एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपये म्हणजे महिन्याला 12,500 रुपये जमा करू शकता. चला तर मग जाणून घेऊ की दर महिन्याला किती रुपये जमा केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता.

PPF वर मिळणारा व्याज परतावा दर :
सध्या भारत सरकार PPF योजना खात्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेत तुम्ही कमाल 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. त्यानुसार, 12500 रुपये प्रति महिना गुंतवणुकीचे 15 वर्षांनी एकूण मूल्य 40,68,209 रुपये असेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 22.5 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला व्याज म्हणून 18,18,209 रुपये परतावा मिळेल.

एक कोटी रुपयांचा निधी कसा तयार होईल, याचे गणित समजून घ्या. 

प्रकरण क्रमांक : 1
*  समजा तुमचे वय सध्या 30 वर्ष असून तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक सुरू केली.
* PPF मध्ये नियमित 15 वर्षे 12500 रुपये जमा केल्यास तुमच्याकडे 40,68,209 रुपयेचा फंड तयार होईल.
* आता PPF चा कालावधी 5-5 वर्षांच्या मुदतीसाठी वाढवा.
* 15 वर्षांनंतर आणखी 5 वर्षे मुदत वाढवल्यास तुमचे एकूण गुंतवणूक मूल्य 66,58,288 रुपये होईल.

म्हणजेच जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी पीपीएफ योजनेमध्ये दरमहा 12500 रुपये जमा करायला सुरुवात केली तर 25 वर्षांनी म्हणजेच तुमच्या वयाच्या 55 ​​व्या वर्षी तुमच्या कडे करोडो रुपयेचा फंड तयार झाला असेल. पीपीएफ खात्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. जर 15 वर्षांनंतर तुम्हाला योजनेची मुदत आणखी वाढवायची असेल तर तुम्ही दर पाच वर्षांसाठी पाच वर्षांसाठी ही मुदत वाढवू शकता.

प्रकरण क्रमांक : 2
PPF मध्ये 12500 रुपयांऐवजी थोडी कमी रक्कम गुंतवणूक तुम्हाला वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर हे गणित समजून घ्या.

* समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी PPF खात्यात 10,000 रुपये जमा करायचा सुरुवात केली. तर
* 7.1 टक्के व्याज दरानुसार 15 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 32,54,567 रुपये झाले असेल.
* जी तुम्ही ही मुदत 5 वर्षांसाठी वाढवली तर मुदत पूर्ण झाल्यावर म्हणजे एकूण 20 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 53,26,631 रुपये झाले असेल.
* 4. 5 वर्षांसाठी मुदत पुन्हा वाढवले तर तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 25 वर्षानंतर 82,46,412 रुपये झाले असेल.

प्रकरण क्रमांक : 3

जर तुम्हाला PPF मध्ये 10,000 रुपयांऐवजी 7500 रुपये प्रति महिना गुंतवणूक करायची असेल आणि वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्ह्यायचे असेल तर तुम्हाला वयाच्या 20 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करावी लागेल.

* जर तुम्ही PPF योजना खात्यात 7500 रुपये प्रति महिना 7.1 टक्के व्याज दराने 15 वर्षांसाठी जमा करत राहिल्यास तुमच्या एकूण गुंतवणूकीचे मूल्य 24,40,926 रुपये होईल.
* पुढे ही योजनेची मुदत वाढवल्यास तुमच्याकडे 30 वर्षांनंतर ही रक्कम वाढून 92,70,546 रुपयेचा फंड तयार होईल.
* आणखी 5 वर्षे मदत वाढवल्यास 35 वर्षेनंतर तुमच्या कडे 1,36,18,714 रुपये जमा झाले असतील.
* जेव्हा तुमचे वय 55 वर्ष असेल तेव्हा तुमच्याकडे 1.25 कोटी रुपयांपेक्षा मोठा फंड तयार झाला असेल. लक्षात ठेवा, PPF मध्ये गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. त्यामुळे तुम्ही लवकर आणि संयमाने गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme for investment and earning huge returns in long term on 24 November 2022

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x