7 May 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सर्वोच्च न्यायालयाची मध्यस्थ समितीची भूमिका आश्चर्यकारक : आरएसएस

Ram Mandir, Supreme Court, RSS

नागपूर: राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काल मध्यस्थीसाठी तिघांची नियुक्ती केली. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश फकीर महम्मद इब्राहिम खलिफउल्ला या मध्यस्थ समितीचे प्रमुख असून त्यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू तसेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान RSSला सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका पटलेली दिसत नाही. दरम्यान, देशातील हिंदूंकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

मागील अनेक वर्ष सुरु असलेला हा वाद मिटवण्यासाठी न्यायालयीन प्रकियेत वेग आणण्याऐवजी सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. हा हिंदूंचा भावनिक विषय असून या संवेदनशील विषयाला सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिकता न देणं आमच्या समजण्यापलीकडे आहे अशी खंत आरएसएसने बोलून दाखवली आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘हिंदूंकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. आम्ही कोर्टाचा सन्मान करतो. परंतु सदर वादावर लवकरात लवकर तोडगा काढत वेगवान प्रक्रिया राबवत न्यायालयाने निर्णय द्यावा आणि भव्य राम मंदिर उभारण्यात येणारे अडथळे दूर करावेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या