25 March 2023 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

Shivsena Vs NCB | आर्यन खान प्रकरणी NCB च्या भूमिकेची चौकशी व्हावी | शिवसेना नेत्याची सुप्रीम कोर्टात याचिका

Shivsena Vs NCB

नागपूर, १९ ऑक्टोबर | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक पुरावे समोर आले होते. ज्यानुसार भाजपशी संबंधित पदाधिकारी कारवाईत साक्षीदार तसेच थेट आरोपींना धरून NCB कार्यालयात घेऊन जाताना दिसले होते. त्याहून महत्वाचं म्हणजे एक साक्षीदार हं फरार आरोप असून तो NCB’च्या कारवाईत खुलेआम वावरताना दिसला होता. त्यानंतर NCB ने अटक केलेल्या अरबाझने थेट कोर्टात (Shivsena Vs NCB) आरोप करताना NCB’ने थेट ड्रग्स ठेवली होती आणि त्यासाठी क्रूझवरील CCTV तपासा असा खात्रीलायक दावा केला होता. त्यात मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे यांचे मित्र-नातेवाईकच अनेक कारवाईत साक्षीदार कसे आणि तेच कसे प्रत्येक घटनेवेळी घटनास्थळी हजर राहून साक्षीदार बनतात हे देखील संशयास्पद आहे. परिणामी एनसीबी देखील अंडर स्कॅनर आली आहे.

Shivsena Vs NCB. A Shiv Sena leader has approached the Supreme Court in the Aryan Khan drugs case. The fundamental rights of the Aryans have been violated during this investigation. Shiv Sena leader Kishore Tiwari, while filing a petition under Article 32 of the Constitution, has appealed to Chief Justice MV Ramanna to intervene in the matter :

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शिवसेनेच्या एका नेत्याने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खान प्रकरणाचा एनसीबीचा तपास पक्षपाती असल्याचे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. या तपासादरम्यान आर्यनच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेना नेत्याने सुप्रीम कोर्टात केली आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संविधानाच्या कलम 32 अन्वये याचिका दाखल करताना सरन्यायाधीश एम व्ही रमण्णा यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

हायप्रोफाईल सेलिब्रेटींविरोधात 2 वर्षांपासून पक्षपाती तपास:
तिवारी यांनी म्हटले आहे की, एनसीबी गेल्या 2 वर्षांपासून पक्षपाती तपास करून चित्रपट कलाकार आणि मॉडेल्सना त्रास देत आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी म्हणाले की, कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची दखल घेण्यास बांधील आहेत. एनसीबी नियमांचे उल्लंघन करत आहे. तिवारी यांनी आपल्या याचिकेमध्ये आर्यनच्या जामिनावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवण्याबाबतचाही उल्लेख केला आहे.

समीर वानखेडे यांच्या भूमिका संशयास्पद:
त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, सार्वजनिक सुट्टीचा हवाला देत जामिनाला स्थगिती देऊन आरोपीचा अपमान केला जात आहे. शिवसेना नेते म्हणाले की, आर्यनला गेल्या 17 दिवसांत बेकायदेशीररित्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हे घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. एनसीबी आणि त्याच्या अधिकाऱ्यांवर काही सेलेब्सना टार्गेट करून सूड घेतल्याचा आरोप करत, शिवसेना नेत्याने ड्रग्स प्रकरणात केंद्रीय एजन्सी आणि समीर वानखेडे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Shivsena Vs NCB Aryan Khan case Shivsena leader Kishor Tiwari moved in Supreme court.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x