29 April 2024 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

निवडणुकी दरम्यान पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल : राज ठाकरे

Raj Thackeray, Amit Thackeray, MNS, Maharashtra Navnirman Sena, Nitin Nandgaonkar, Tulsi Joshi

मुंबई : भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. निवडणुकांआधी आणखी एक हल्ला होण्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा कार्यकर्त्यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतला. जवानांच्या शौर्यावर संशय नसून सरकारच्या माहितीवरच विश्वास नाही. हल्ल्याची पूर्वसूचना मिळूनही एअरलिफ्ट करण्याऐवजी जवानांना त्या धोकादायक रस्त्यावरून पाठवले. एअर स्ट्राइकमध्ये दहा लोकही मेले नाहीत. जवानांचा हकनाक बळी गेल्यानंतरही कुणी साधा प्रश्नही उपस्थित करायचा नाही का, असा सवाल त्यांनी केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप, दाऊदचे प्रत्यार्पण, राम मंदिर या सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरल्याने अशा घटना घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पाकिस्तानचे १० लोक जरी मारले असते, तरी इम्रान खान यांनी कॅप्टन अभिनंदन यांना सोडले नसते. त्यामुळे भाजपाकडून केले जाणारे सर्व दावे साफ खोटे आहेत, असे ते म्हणाले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x