3 May 2024 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शिंदे गट फोडण्यासाठी 3000 कोटी खर्च, 2500 कोटी आमदारांवर खर्च, 500 कोटी त्यांच्या मॅनेजमेंटवर खर्च झाले, वरिष्ठ पत्रकाराचा दावा

Senior journalist Prakash Pohare

50 Khoke Ekdam Ok? | एकीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे आमदार खूपच अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी गटातून बाहेर पडू शकतात. ते फुटू नयेत यासाठी या आमदारांना पुन्हा ५-५ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खैरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, या सरकारला शिवाजी महाराजांबाबत काही आस्था नाही. शेतकऱ्यांबद्दल कळवळा नाही. केवळ आमदार फुटू नये याकडे यांचे लक्ष आहे. त्यांना खोके द्यायचे एवढेच काम सुरू आहे. आताही त्यांनी काही आमदारांना पकडून ठेवले आहे. गुवाहाटीला काही आमदारांना अजून खोके दिले. ५-५ खोके दिले. मात्र राज्याकडे लक्ष नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

अनुभवी पत्रकारांच्या सत्य हिंदी युट्युब चॅनेलवर चर्चा
दुसरीकडे, अनुभवी पत्रकारांच्या सत्य हिंदी या प्रसिद्ध युट्युब चॅनेलवर “स्वतंत्र पत्रकारितेला भवितव्य नाही का?” या विषयावर चर्चा सुरु होती. त्याला कारण ठरलं होतं एनडीटीव्ही मधून रावीश कुमार यांचा राजीनामा. यावेळी चर्चा सुरु असताना वरिष्ठ पत्रकार प्रकाश गोपाळराव पोहरे यांनी एक धक्कादायक माहिती दिली. ती माहिती होती शिंदे गटाच्या फुटीसंदर्भात आणि त्यातील भाजपच्या भूमिकेसंदर्भातील. प्रकाश पोहरे हे मराठी दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आहेत. ते अकोल्यात राहतात, जिथे देशोन्नतीचे मुख्यालय आहे. प्रकाश पोहरे हे सामाजिक कार्यकर्तेही आहेत आणि ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रयत्नशील असतात.

प्रकाश पोहरे यांनी कोणता दावा केला?
यावेळी उपस्थित वरिष्ठ पत्रकारांसोबत बोलताना प्रकाश पोहरे यांनी दावा केला की, “आम्ही नुकतीच एक बातमी छापलेली की महाराष्ट्रात जो सत्ता बदल झाला त्यासाठी ३००० कोटी खर्च करण्यात आले, त्यातील २५०० कोटी हे आमदारांना देण्यात आले आणि ५०० कोटी या घटनेच्या मॅनेजमेंटवर खर्च करण्यात आले… ही बातमी छापणारं आमचंच वृत्तपत्र होतं.. पण कोणाची हिम्मत झाली नाही मला फोन करून विचारण्याची.. कारण आमच्या बातमीत दम होता आणि पुरावा होता आमचा, अशी खात्रीलायक माहिती पत्रकारांच्या चर्चेत दिली. त्यामुळे या विषय केवळ राजकीय विरोधकांपर्यंत मर्यादित न राहता वरिष्ठ पत्रकार देखील यावर ठामपणे खुल्या मंचावर बोलू लागले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या दाव्याला बळ मिळतंय तर शिंदे अजून बदनाम होणार असंच म्हणावं लागेल. या चर्चेचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता की वरिष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी या चर्चेत नेमका काय खुलासा केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Senior journalist Prakash Pohare made serious allegation on Shinde Camp on Satya Hindi YouTube debate check details on 01 December 2022.

हॅशटॅग्स

#Senior journalist Prakash Pohare(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x