29 April 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
x

Vastu Tips | घरात आर्थिक अडचणी आहेत? नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वस्तू घरी आणा, आर्थिक बदल अनुभवा

Vastu Tips

Vastu Tips | वर्ष २०२२ अखेरचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. नव्या वर्षापासून प्रत्येकालाच नव्या अपेक्षा आहेत. दु:खापासून मुक्ती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि संपूर्ण वर्ष आनंदाने भरलेले असावे. 2023 साली तुम्ही तुमच्या घरात काही गोष्टी आणाव्यात, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल आणि पैशांची कमतरता भासणार नाही. या गोष्टींविषयी जाणून घेऊ.

तुळशीचे रोप :
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवीन वर्षानिमित्त इनडोअर प्लांट लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही घरात तुळशीचं रोप लावू शकता.

मोर पंख :
वास्तुनुसार ज्या घरात मोराचे पंख असते, त्या घरात देवी लक्ष्मी राहते. मोराची पंख हे भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहेत. नववर्षात आयुष्यात भरभराट हवी असेल तर मोराचे पंख जरूर आणा. पण त्यांची संख्या १-३ असावी.

मोती शंख :
भगवान विष्णूच्या हातातला शंख आपण सर्वांनी पाहिला आहे. पण घरात मोत्याचा शंख ठेवला तर त्यामुळे कधीही आर्थिक चणचण निर्माण होत नाही आणि सुख-समृद्धी राहते. नवीन वर्षानिमित्त मोत्यांच्या शंखशिंपल्या खरेदी करा आणि त्याची पूजा केल्यानंतर ते तिजोरीत किंवा जेथे पैसे ठेवता तेथे ठेवा. यामुळे करिअरमधील प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि पैशांची कमतरताही भासत नाही.

मेटल हत्ती :
वास्तुशास्त्रानुसार घरात धातूपासून बनवलेला हत्ती ठेवल्यास तो अतिशय शुभ मानला जातो. त्यातून सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो आणि नकारात्मक ऊर्जा संपू लागते. तसेच घरात सुख-समृद्धी वाढते. नवीन वर्षात चांदीच्या धातूपासून बनवलेली हत्तीची मूर्ती खरेदी करा.

छोटा नारळ :
घराच्या आर्थिक स्थितीत उत्तम आणि समृद्धी राखायची असेल तर छोटा नारळ गुंडाळून तिजोरीत ठेवावा.

मेटल कासव :
वास्तुशास्त्रात कासवाला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नवीन वर्षाच्या आधी याची खरेदी करणे खूप भाग्यवान मानले जाते. तुम्ही चांदी, ब्राँझ किंवा पितळी कासव घेऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vastu Tips on financial solutions as per Vastu Shastra check details on 02 December 2022.

हॅशटॅग्स

Vastu Tips(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x