15 December 2024 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Skincare Facts | प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या टेक्सचरप्रमाणे त्वचेतही फरक असतो, त्वचेच्या काळजी कशी घ्यावी जाणून घ्या

Skincare Facts

Skincare Facts |  आपल्या त्वचेची काळजी कश्या प्रकारे घ्यायची याबाबत खुप जणांना माहिती नसते, त्यामुळे काळजी घेता येत नाही. आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या टेक्सचरप्रमाणे त्वचेतही फरक असतो. काहींची त्वचा ही तेलकट असते तर काहींची त्वचा सतत कोरडी पडते. वाढत्या वयानुसार त्वचेच्या गरजाही बदलत राहतात. प्रत्येक परिस्थितीत दुसऱ्या व्यक्तीच्या त्वचेसाठी वापरले जाणारे मॉइश्चरायझर किंवा अँटी-एजिंग क्रीम फायदेशीर आहेच असे नसते, ते तुमच्या त्वचेसाठीही तितकेच प्रभावी असायला हवे.

स्मार्ट टीप:
प्रत्येकांच्या त्वचेच्या वेगवेगळ्या गरजा असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन योग्य मॉइश्चरायझर किंवा अँटी-एजिंग क्रीमचा वापर करा.

गैरसमज:
कॉस्मेटिक किंवा त्वचेची काळजी घेणारे कोणतेही उत्पादन जितके महाग असते तितकेच ते अधिक प्रभावी असते.

खूप वेळा आपला गैरसमज होतो की, जेवढ्या वस्तु महाग तेवढ्या त्या परिणामकारक ठरतात. कोणत्याही वेगळ्या मुद्द्यावर तुमचे मत बरोबर असू शकते मात्र या बाबतीत म्हणजेच सौंदर्य प्रसाधने किंवा त्वचेची काळजी घेण्याच्या उत्पादनांच्या बाबतीत विचारपुस करूनच सल्ल्यानुसार वापरावी. आपल्याला असे वाटते की, जेवढी वस्तु महाग तेवढी ती प्रभावदायी मात्र हा फॉरम्युला प्रत्येक वेळीच काम करेल असं नाही.

स्मार्ट टीप:
खरे तर प्रोडक्टवरील किंमत पाहण्यापेक्षा त्यामध्ये कोणत्याप्रकारची जीवनसत्वे आहेत हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

गैरसमज:
आपला चेहरा सतत धुण्याने केवळ त्वचा स्वच्छ व निरोगी राहते.

याला पूर्ण सत्य म्हणता येणार नाही कारण डोळ्यांची क्रीम्स असो किंवा विशेष अँटी-एजिंग क्रीम्स, केवळ वृद्धत्वाची चिन्हे काही प्रमाणात रोखण्यासाठी वापरली जातात. महागड्या आय क्रीम अधिक प्रभावी ठरतात असे नाही त्यामुळे किंमतीच्या आधारावर आय क्रीम निवडू नका.

स्मार्ट टीप:
सुरकुत्या आणि डाग टाळण्यासाठी, अगदी सुरुवातीपासून अँटी-एजिंग क्रीमचा वापर करा. याच्या मदतीने तुम्ही तरुण दिसण्यास मदत होते.

गैरसमज: मॉइश्चरायझर असलेल्या साबणाचा वापर करून त्वचेचा कोरडेपणा दूर केला जातो.

त्वचेला मॉइश्चरायझरची गरज भासत नाही असा विचार करणेच मुळात चुकीचे आहे त्वचेला मॉइश्चरायझरची गरज असते, आणि हेही तितकेच सत्य आहे की, साबण मॉइश्चरायझरची गरज पूर्ण करू शकत नाही. त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरची गरज असते.

स्मार्ट टीप:
मॉइश्चरायझर असलेला साबण लावणे म्हणजे त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नाही असा होत नाही आणि निरोगी त्वचेसाठी मॉइश्चरायझर वापरणे खूप महत्वाचे असते यामुळे त्वचा मुलायम आणि कोमल राहते.

गैरसमज:
पावसाळ्यात आणि थंडीच्या वातावरणात सनस्क्रिन लावण्याची गरज नाही.

उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण खुप जास्त असते ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडू शकते व टॅन होऊ शकते आणि अश्या वेळी आपण सनस्क्रिनचा वापर करतो. दरम्यान, कडक ऊन फक्त उन्हाळ्यात असते, मग पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात का सनस्क्रिन लावावी? पण तसे नाही, उन्हाळ्यात सूर्याची अतिनील किरणे त्वचेसाठी जितकी हानिकारक असतात तितकीच ती हिवाळ्यात आणि पावसातही हानिकारक असतात.

स्मार्ट टीप: हवामान कोणतेही असो, तुमच्या मुलायम त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही बाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन लावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How to take care of your skin Checks details 15 September 2022.

हॅशटॅग्स

Skincare Facts(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x