8 May 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?
x

महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं, शिंदेंचा आवाज फक्त शिवसेनेविरोधात वाढतो?

Karnataka Chief Minister

CM Basavaraj Bommai Statement | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजत असतानाच कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलंय. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असं म्हणत बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं असून, कर्नाटक विधानसभेत त्यांनी ही भूमिका मांडलीये. त्यामुळे सीमावादाच्या प्रश्नाचा पुन्हा भडका उडणार असंच दिसतंय.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादात केंद्राने मध्यस्थी केली. सीमावाद प्रकरणात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश केंद्राने दिले. हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न होत असून, सरकारकडूनही यावर भूमिका मांडण्यात आली आहे.

शिवसेना आक्रमक :
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, महाराष्ट्राच्या जागांवर हक्क सोडणार नाही असा ठराव मांडला आहे. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची कधी झाली. सीमाप्रश्न जुना असला तरी ही भाषा योग्य नाही. अमित शहांसोबत बैठक झाली तरी हे बोम्मई उठतात आणि महाराष्ट्राच्या तोंडात मारता आणि आपले मुख्यमंत्री गाळ चोळत अधिवेशनाला जातात, असा सणसणीत टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Chief Minister again make controversial statement check details on 21 December 2022.

हॅशटॅग्स

#Karnataka Chief Minister(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x