5 May 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

हे शिवसेनेचे वाघ? पालघर शिवसेना नगरसेवकाची जन्मदात्या आईला संपत्तीसाठी मारहाण

Shivsena, Udhav Thackeray

पालघर : जन्मदात्या आईची संपत्ती स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी शिवसेना नगरसेवकाने आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. स्थानिक शिवसेना नगरसेवक मकरंद पाटील यांनी हा संतापजनक प्रताप केला आहे. सदर प्रकरणी मकरंद पाटील, त्यांची पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांच्याविरोधात मकरंद पाटील यांच्या आईने पालघर पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

विद्यमान नगरसेवक मकरंद पाटील यांच्या आई सुचिता पाटील या स्वतः एक सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. सेवेतून निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच विकासक म्हणून छोटं कार्यालय सुरु केलं. पतीच्या आणि स्वतःच्या मेहनतीने त्यांनी आपली मालकी संपत्ती देखील जमवली. परंतु, मकरंद पाटील यांनी कटकारस्थानाने ती सर्व संपत्ती आपल्या नावे केली, अशी तक्रार सुचिता पाटील यांनी केली आहे. या तक्रारीमुळे श्वेता मकरंद पाटील आणि मकरंद पाटील यांच्या राजकीय अडचणींमध्ये देखील प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

मकरंद पाटील यांच्या आई आणि श्वेता पाटील यांच्या सासू सुचिता पाटील यांच्या पालघर शहरातील गणपती एन्क्लेव या इमारतीत २ सदनिका आहेत. त्या सदनिका त्यांनी स्वतःच्या मेहनतीने खरेदी केल्या आहेत. परंतु, नगरसेवक असलेल्या मकरंद पाटील यांनी सदनिका भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांना विकत असल्याचा बनाव करत आपल्याच आईची दिशाभूल केली. त्यांच्याकडून विविध कागदपत्रांवर खोट्या सह्या घेतल्या. इतकंच नाही तर जिवंतपणीच स्वतःच्या आईचं मृत्यूपत्र देखील मकरंद पाटील यांनी बनवून घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, मृत्यूपत्रात त्यांनी आईने सर्व संपत्तीचा वारस म्हणून स्वत:लाच देऊ केल्याचा उल्लेख केला आहे. हे सर्व होत असताना सुचिता यांनी मकरंद यांना विरोध केला. त्यामुळे मकरंद पाटील यांनी कार्यालयात स्वतःच्या आईलाच जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. जोरजबरदस्तीने त्यांची सर्व संपत्ती आपल्या नावे करुन घेतल्याचा आरोप आईने केला आहे.

सुचिता पाटील या अनेक आजार तसेच शारिरीक व्याधींनी त्रस्त असतानाही आपली सून आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांच्या प्रचारासाठी पालघरला आल्या होत्या. तिथे मकरंद यांनी घराची मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे मागितली. परंतु, सुचिता यांनी कागदपत्र देण्यास सक्त मनाई केली. तेव्हा मकरंद यांनी त्यांना भीती दाखविली. याआधी आपल्याला त्यांच्याकडून झालेली मारहाण आणि त्रास लक्षात घेता सुचिता यांनी सर्व कागदपत्रे मकरंद यांना दिली. परंतु, त्यांना आपल्या संपत्तीबाबतच्या कागदपत्रांबाबत शंका आली. त्यामुळे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाकडे त्या कागदपत्रांची मागणी केली. दस्तऐवज त्यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी ते तपासले, त्यात त्यांची सर्व संपत्ती मुलगा मकरंद याने स्वत:च्या नावे केल्याचे आढळून आलं. त्यानंतर सुचिता यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच मुलगा मकरंद पाटील, त्याचे साथीदार आणि सून श्वेता पाटीलसह खोट्या सह्या घेणारे डॉ.अभय पागधरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

 

नगराध्यक्षापदाच्या दावेदार असलेल्या उमेदवाराच्या घरातच अशी परिस्थिती असेल, तर ती या जनतेला काय न्याय देऊ शकेल? त्यामुळे जनतेने याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहनही सुचिता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील निष्ठावंत शिवसैनिकांच्या आक्रोशाला डावलून पाटील दाम्पत्यावर विश्वास ठेवला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत घेतलं होतं. मात्र, या प्रकरणानंतर शिंदे काय पाऊल उचलतात याकडे पालघर शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x