
Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीसह टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 8 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचल आहेत. टाटा स्टील कंपनीच्या शेअरची मागील 6 महिन्यांची कामगिरी पाहिली ते आपल्या समजेल की, या स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 34 टक्क्यांची वधारली आहे. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 115.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 20 मे 2022 रोजी हा स्टॉक 117 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 150 रुपये किमतीवर जातील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बिझनेस स्टँडर्डने जाहीर केलेल्या अहवालानुसार ब्रोकरेज फर्म जेफरीजने विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील काळात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करतील. म्हणूनच जेफरीजने टाटा स्टील स्टॉकला ‘ बाय ‘ टॅग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, चीनमध्ये कोविडचे नियम शिथिल होत आहेत, आणि याचा स्टील उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल.
शेअरची वाटचाल :
टाटा स्टील कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी मागील एक महिना थोडा निराशाजनक ठरला होता. मागील एक महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअरची किंमत 0.17 टक्क्यांनी कमी झाली आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची बीएसई इंडेक्सवर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 138.63 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 82.71 रुपये होती. टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1,41,506.53 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.