12 May 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

२०१४ मध्ये गंभीरने जेटलींचा प्रचार केला आणि ते पराभूत झाले, आता तो भाजपचा प्रचार करणार

BJP, Narendra Modi, Gautam Gambhir

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने आमच्या पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचं यावेळी गौतम गंभीरने सांगितलं. देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल यावेळी गौतम गंभीरने भाजपाचे आभार मानले. गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासंबंधी बोलण्यास यावेळी अरुण जेटली यांनी नकार दिला. तिकीट देण्यासंबंधीचा निर्णय निवडणूक समितीवर सोडून देऊयात. गौतम गंभीर यांना योग्य ती जबाबदारी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत असून काही मोठे बदल केले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. गौतम गंभीरचा प्रवेश त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x