
PTC India Share Price | पीटीसी इंडिया ही पॉवर ट्रेडिंग कंपनी मागील बऱ्याच काळापासून विक्रीच्या दाबला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी पीटीसी इंडिया कंपनीत गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. अदानीसोबतच इतर अनेक कंपन्या पीटीसी इंडिया कंपनी विकत घेण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. या कंपनीसाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून बोली लावायला सुरुवात होईल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अदानी उद्योग समूह कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी खरेदी करू इच्छित आहेस आणि त्यासाठी अदानी मोठी बोली लावू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
पीटीसी इंडिया कंपनीच्या प्रवर्तक कंपन्यामध्ये अनेक सरकारी मालकीच्या कंपन्या जसे की, एनटीपीसी लिमिटेड, एनएचपीसी लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांचा समावेश होतो. आणि या सर्व कंपन्यां आपल्या मालकीचा प्रत्येकी 4 टक्के भाग भांडवल वाटा विकू शकतात, अशी शक्यता आहे. मात्र या कंपन्यांकडून भाग भांडवल विक्रीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
अदानी उद्योग समूहाचे वर्चस्व :
पीटीसी इंडिया कंपनीच्या प्रतिनिधीने प्रवर्तक आपले भाग भांडवल विकणार आहे, अशी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अदानी उद्योग समूहाने पीटीसी इंडिया कंपनीतील भाग भांडवल अधिग्रहण केले तर, अदानी उद्योग समूह भारतीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा प्लेअर होईल. अदानी उद्योग समूहाचे वर्चस्व मुख्यतः कोळसा खाण आणि व्यापार व्यवसायासह ऊर्जा क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणत आहे. आणि अदानी पॉवर कंपनी पारेषण आणि वितरणाच्या व्यवसायातही सक्रिय आहे.
अदानी उद्योग समूहाने पीटीसी इंडिया कंपनीचे अधिग्रहण करण्या यासंदर्भातील मेलबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र अदानी ग्रुपच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे की, अदानी उद्योग समूह आपला व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात आहे. त्याच वेळी, पीटीसी इंडियाच्या प्रतिनिधीने अदानी उद्योग समूह आणि पीटीसी इंडिया यांच्यातील कोणत्याही डील बाबत माहिती नाही, असे म्हंटले आहे. याशिवाय, पीटीसी इंडिया कंपनीच्या प्रवर्तक कंपन्यांच्या प्रवक्त्याकडूनही कोणतीही प्रतिक्रिया किंवा डील बाबत होकार आलेला नाही.
पीटीसी इंडिया शेअरची कामगिरी :
पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये मागील 12 महिन्यांत 23.1 टक्क्यांची जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. ब्लूमबर्ग द्वारे प्रकाशित एका अहवालानुसार, पीटीसी इंडिया कंपनीचे बाजार मूल्य सध्या 301 दशलक्ष डॉलर्स आहे. पीटीसी इंडिया कंपनीची स्थापना 1999 साली सार्वजनिक-खाजगी उपक्रम म्हणून झाली होती. पीटीसी इंडिया कंपनीचे पूर्ण नाव ‘पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ असे आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार कंपनीने 2001 मध्ये ऊर्जा ट्रेडिंग व्यापार सुरू केला होता. ऊर्जा ट्रेडिंग क्षेत्रात पीटीसी इंडिया कंपनीचा सर्वात मोठा बाजार हिस्सा आहे. आणि कंपनीच्या ग्राहकांमध्ये भारतातील सर्व राज्य तसेच शेजारील काही देश ही सामील आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.