10 May 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या
x

5Paisa Capital Share Price | 213% परतावा देणाऱ्या शेअर कंपनीचा तिमाही नफा 1389% वाढला, स्टॉकची जोरदार खरेदी सुरु

5Paisa Capital Share Price

5Paisa Capital Share Price | ‘5 पैसा कॅपिटल’ या Smallcap कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत स्टॉक ब्रोकिंग फर्म ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीने 11.02 कोटी रुपये नफा कमावला आहे, जो मागील तिमाहीच्या तुलनेत 1389.19 टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी डिसेंबर 2021 तिमाहीत या कंपनीने 0.74 कोटी रुपये नफा कमावला होता. जबरदस्त तिमाही निकाल येताच गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढले होते. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘5पैसा कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 322.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 5Paisa Capital Share Price | 5Paisa Capital Stock Price | BSE 540776 | NSE 5PAISA)

कंपनीचा तिमाही महसूल :
ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत ‘5पैसा कॅपिटल’ कंपनीने 83.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात तिमाही आधारावर 4 टक्के वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर देखील ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीचे उत्पन्न 4 टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीचा ऑपरेटिंग खर्च वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी कमी झाला आहे. या तिमाहीत ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीच्या ग्राहक वर्गात 1,62,400 नवीन ग्राहकांची भर पडली आहे. या कंपनीच्या एकूण नोंदणीकृत ग्राहकांची संख्या सध्या 33,53,400 वर गेली आहे.

3 वर्षांत 213 टक्के परतावा :
गेल्या 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 213 टक्के परतावा कमावून दिला आहे. स्टॉक ब्रोकिंग फर्मचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी BSE इंडेक्समध्ये 105.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 जानेवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर 5 पैसा कॅपिटलचे कंपनीचे शेअर्स 351.85 रुपये किमतीवर स्थिर झाले होते. आज शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 322 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 443.20 रुपये होती. तर ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 265 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के कमजोर झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | 5paisa Capital Share Price 540776 in focus check details on on 13 January 2023.

हॅशटॅग्स

5Paisa Capital Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x