30 April 2024 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

VIDEO: उत्तर प्रदेशात कुचकामी ठरू शकतो पुलवामा मुद्दा: द वायर वृत्त

Pulawama, Jammu Kashmir, Narendra Modi, BJP

लखनौ : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यानंतर देशातील वातावरण तापून गेले. त्यात महिन्याभराने झालेल्या एअर स्ट्राईकनंतर सत्ताधारी भाजपने लष्कराच्या नावाने स्वतःचा प्रचार आटपून घेतला आणि स्वतःसाठी वातावरण निर्मिती करून घेतली.

परंतु, सत्ताधारी भाजपासाठी महत्वाचा असलेला उत्तर प्रदेश आणि हिंदी भाषिक पट्यात भाजप भ्रमात असल्याचं चित्र आहे. कारण उत्तर प्रदेशातील ज्या भागातून अनेक शहीद आणि विशेष करून सीआरपीएफ’च्या जवानांवरील नुकत्याच झालेल्या भ्याड हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले आणि त्यांची कुटुंब ज्या भागातून येतात तेथेच ‘द वायर’च्या प्रतिनिधींनी सामान्य लोकांशी संवाद साधला आणि निवडणूकपूर्व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला.

सामान्य लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपच्या वाभाडे काढणाऱ्या आणि जवानांप्रती आत्मीयता दाखवणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे भाजपने या विषयाला अनुसरून जे राजकारण केलं, त्यावरून येथील लोकं प्रचंड नाराज असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे भाजप जरी काही पेड प्रसार माध्यमांच्या आडून सत्ताधाऱ्यांबद्दल होकारात्मक परिस्थिती दाखवत असलं तरी जमिनीवरील वास्तव वेगळंच असल्याचं त्यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

VIDEO : काय आहेत त्या स्थानिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x